सध्याच्या स्थितीला राज्यातील निर्बंध जाचामुळे उपाहारगृहे तसेच हॉटेल व्यवसाय हा चांगलाच संकटात सापडलेला आहे. निर्बंध शिथील झाल्यानंतरही केवळ ४ पर्यंतची वेळ दिल्यामुळे आता उपाहारगृह मालक आणि हॉटेल चालक चांगलेच वैतागले आहेत. सर्व काही चालू झाले मग केवळ हॉटेल व्यवसायवरच बंधने का असा प्रश्न आता विचारण्यात येत आहे. याकरता आता ठाण्यातील हॉटेलचालक आयुक्तांना निवेदन देणार आहेत. दिलासा न मिळाल्यास आता सोमवारपासून ठाण्यातील हॉटेल बेमुदत बंद करण्याचा इशारा आता हॉटेल ओनर्स असोसिएशनचे सचिव रघुनाथ राय यांनी दिला आहे.
हॉटेल चालकांच्या म्हणण्यानुसार दुपारी केवळ चारपर्यंतची वेळ म्हणजे हॉटेल बंदच ठेवण्यासारखे आहे. मुख्य म्हणजे बहुतांशी लोक हे संध्याकाळी हॉटेलमध्ये जातात. त्याचवेळेमध्ये हॉटेलबंद असल्यामुळे चालकांचे करोडोंचे नुकसान झालेले आहे.
गेले दीड वर्षे महाराष्ट्रातील टाळेबंदीमुळे अनेक व्यवसाय बुडाले. केवळ इतकेच नाही तर, निर्बंधजाचामुळे व्यापारी अक्षरशः हवालदिल झालेले आहेत. उपहारगृहे बंद असल्यामुळे त्यावर अवलंबून असलेल्या घटकांनाही बेरोजगारीला सामोरे जावे लागत आहे. ३० हजार उपहारगृहातील तीन लाख कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. इतकेच नाही तर या उपाहारगृहांना मालाचा पुरवठा करणारे उद्योगही आता बुडाले आहेत. त्यामुळे या उद्योगांनाही आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.
हे ही वाचा:
बारावीचा निकाल यंदा फर्स्ट क्लास! त्यामुळेच वाढली चिंता
ऑफिसमध्ये १०० टक्के उपस्थिती हवी, पण जायचे बसनेच!
मै तुम्ही खाना खिलाता हूँ, म्हणत रिक्षाचालकाने केला बलात्कार
ठाण्यात खड्डे उखडलेत आणि लोकही!
कोरोना काळात हलाखीच्या परिस्थितीत ४० टक्के म्हणजेच सुमारे ३० हजार उपाहारगृह, धाबे टाळेबंदीच्या निर्बंधामध्ये कायमस्वरूपी बंद पडले आहेत. सध्या उपाहारगृहे सुरु आहेत. परंतु केवळ सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंतच. त्यानंतर केवळ घरपोच सेवा देण्यात येत आहे. धंद्यामध्ये मोठे आर्थिक नुकसान होत असल्यामुळेच, मुंबईतील जवळपास ४० टक्के उपहारगृहे कायमस्वरूपी बंद झालेली आहेत.