महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादाचा मुद्दा लोकसभेत झाला उपस्थित

संसदेत सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला मुद्दा

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादाचा मुद्दा लोकसभेत झाला उपस्थित

सीमाभागात सोमवारी काही मराठी भाषिकांवर हल्ला झाल्याची या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांतील राजकीय नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. बुधवारपासून सुरु झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी त्याचे पडसाद संसदेत उमटलेले बघायला मिळाले.या अधिवेशनात महाराष्ट्र -कर्नाटक सीमाप्रश्नासोबतच देशातील इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची अपेक्षा होती. त्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी या प्रश्नावर संसदेत गदारोळ झाला. लोकसभेतील राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या मुद्द्यावरून सत्ताधारी भाजपवर हल्लाबोल केला. महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या सीमावादात केंद्रीय गृहमंत्रालयाने हस्तक्षेप करण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.

लोकसभेत शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित करताना सुळे म्हणाल्या की, दोन्ही राज्यात भाजपची सत्ता असूनही महाराष्ट्रातील लोकांना दररोज मारहाण होत आहे. गेल्या १० दिवसांत महाराष्ट्र तोडण्याचे षडयंत्र रचले जात आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करावा,” असे त्या म्हणाल्या.

गेल्या १० दिवसांपासून महाराष्ट्रात एक नवा प्रश्न निर्माण झाला आहे. कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री काहीही बोलत आहेत. महाराष्ट्रातील लोक कर्नाटक सीमेवर जात असताना, त्यावेळी त्यांना मारहाण करण्यात आली. गेल्या १० दिवसांपासून महाराष्ट्राच्या विरोधात कट रचला जात होता . दोन्ही राज्यात भाजपची सत्ता आहे , मात्र , कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या विरोधात बोलतात. काल महाराष्ट्रातील जनतेला मारहाण झाली. ते चालणार नाही. हा देश एक आहे. यावर मी अमित शहा यांना काही बोलण्याची विनंती करेन असे सुळे म्हणाल्या .

हे ही वाचा:

बेळगावमध्ये कन्नड रक्षण वेदिका संघटनेने महाराष्ट्रातील गाड्यांवर केला हल्ला

‘बाबासाहेबांच्या संविधानामुळेचं मी मुख्यमंत्री झालो’

पाकिस्तानशी चर्चा नाहीच, भारताची भूमिका

एक्झिट पोलनुसार गुजरात, हिमाचलमध्ये भाजपाचा बोलबाला

सुळे यांच्या वक्तव्यावर कर्नाटकातील भाजप खासदारांनी आक्षेप घेत हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे म्हटले. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, हा संवेदनशील मुद्दा आहे आणि दोन राज्यांमधील विषय आहे. याचा केंद्राशी काय संबंध? या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या सदस्यांनी सभागृहातून सभात्याग केला.

Exit mobile version