विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घाटकोपर येथील कोविड रुग्ण विलगीकरण कक्षाच्या उद्घाटनासाठी हजेरी लावली होती. यावेळी बोलताना त्यांनी अनिल देशमुखांवरील याचिकेवर न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या संदर्भात देखील चर्चा केली. त्याबरोबरच गृहमंत्र्यांनी आता राजिनामा द्यावा असेही ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले की, रुग्णांना अनेक ठिकाणी बेड्स उपलब्ध होत नाहीयेत. त्यामुळे अशा विलगीकरण कक्षाची गरज होतीच. कोरोनाचा पुन्हा एकदा आपल्याला सामना करावा लागणार आहे. त्यामुळे लसीकरणात भाजपाचे कार्यकर्ते मागे राहणार नाहीत. कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात लसीकरण घडवून आणतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हे ही वाचा:
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर राजीनामा द्या
सामान्य जनतेसाठी लॉकडाऊन, मंत्री मात्र विनामास्क प्रचारात
अमित शाहांनी वाहिली हुतात्मा जवानांना श्रद्धांजली
त्यानंतर माध्यमांकडून देवेंद्र फडणवीस यांना अनिल देशमुख यांच्याबद्दल उच्च न्यायलयाने दिलेल्या निर्णयाबाबत प्रश्न विचारण्यात आले. देवेंद्र फडणवीस यांनी हा अतिशय महत्त्वपूर्ण निकाल असल्याचे यावेळी म्हटले. त्याबरोबरच आता गृमंत्र्यांनी राजिनामा दिला पाहिजे कारण आता या संपूर्ण प्रकरणाचा तपासच सीबीआयकडे गेला आहे. महाराष्ट्रात खंडणीखोरीची काय प्रकरणे उघडकीस येतील असेही ते म्हणाले.
सीबीआयने चौकशी करून दखलपात्र गुन्हा आढळल्यास मग एफआयआर दाखल करावी असा आदेश न्यायालयाने दिल्याने आता या पदावर राहणे नैतिकतेला धरून नाही, असा टोला देखील त्यांनी गृहमंत्र्यांना लगावला. त्याबरोबरच या संपूर्ण प्रकरणाबाबत मुख्यमंत्र्यांनी बाळगलेलं मौन हे देखी आश्चर्यकारक असल्याचे देखील ते म्हणाले आहेत. त्याबरोबरच या सरकारने मोठ्या प्रमाणात पोलिसांचं खच्चीकरण केलं असा घणाघाती आघात देखील त्यांनी सरकारवर केला.