सोमवारी महाराष्ट्रात सगळीकडे होळी, रंगपंचमीचा उत्साह असताना नांदेड जिल्ह्यात मात्र पोलिसांवरच हल्ला झाला होता. नांदेड जिल्ह्यात शीख समाजाच्या तरुणांनी हा हल्ला केला होता. या हल्ल्यात काही पोलीस जखमी झाले. जमावाकडून पोलिसांवर झालेल्या या हल्ल्यामुळे नांदेडमधील वातावरण सध्या तणावाचे झाले होते. यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी देखील सरकारविरोधात आवाज उठवला आहे. नांदेड मधील पोलिसांवरच झालेल्या हल्ल्यावरून ट्वीट करत मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना लक्ष्य केले आहे. त्यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ‘नांदेड येथे शीख समाजाच्या कार्यक्रमात पोलिसांवर हल्ला झाल्यामुळे राज्याचा कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे. गृहमंत्र्यांनी टार्गेट बाजूला ठेवून इथेही जरा लक्ष द्यावे. जमल्यास मुख्यमंत्र्यांनी घरातून बाहेर पडून नांदेडला भेट द्यावी.’
नांदेड येथे शीख समाजाच्या कार्यक्रमात पोलिसांवर हल्ला झाल्यामुळे राज्याचा कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे. गृहमंत्र्यांनी टार्गेट बाजूला ठेवून इथेही जरा लक्ष द्यावे. जमल्यास मुख्यमंत्र्यांनी घरातून बाहेर पडून नांदेडला भेट द्यावी. pic.twitter.com/Z3fOEXem9r
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 30, 2021
हे ही वाचा:
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया होण्याची शक्यता
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर ताजिकिस्तान भेटीवर
शीख समाजाचा ‘होला मोहल्ला’ हा धार्मिक सण साजरा केला जात होता. महाराष्ट्रातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक उत्सवांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे शीख समाजाला ‘होला मोहल्ला’ हा त्यांचा धार्मिक उत्सव सार्वजनिकपणे साजरा करायला पोलीस प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात आली होती. गुरुद्वारा समितीला यासंबंधी कळविण्यात आले होते आणि त्यांनी हा उत्सव गुरुद्वाराच्या आताच साजरा करण्याचे मान्य केले होते. पण सोमवारी अचानक ४ वाजताच्या सुमारास शीख जमावाकडून निशान साहिब गुरुद्वाराच्या दरवाज्यावर आणण्यात आला. अंदाजे ३०० ते ४०० तरुणांचा जमाव होता. हा जमाव पोलिसांसोबत हुज्जत घालू लागला. एका क्षणी हे सगळेच नियंत्रणाबाहेर झाले आणि त्यांनी बंद असलेले गेट तोडले. ते पोलिसांवर धावून गेले. त्यांनी पोलिसांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात चार पोलीस अधिकारी जखमी झाले तर अनेक गाड्यांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे.
शीख समुदायासाठी नांदेड येथे असलेला ‘तखत सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब गुरूद्वारा’ हा गुरुद्वारा एक पवित्र धार्मिक स्थळ आहे. हा गुरूद्वारा शीखांचे दहावे गुरू गुरू गोविंद सिंग यांच्या स्मरणार्थ १८३२ मध्ये महाराजा रणजित सिंग यांनी बांधला होता. गुरू गोविंद सिंग यांनी त्यांचा अखेरचा श्वास नांदेड येथे घेतला होता