25 C
Mumbai
Friday, November 22, 2024
घरराजकारण'शबाना, नसीरुद्दीन स्लीपर सेल एजंट'

‘शबाना, नसीरुद्दीन स्लीपर सेल एजंट’

मध्यप्रदेशचे गृहमंत्री नराेत्तम मिश्रा यांचा चौफेर हल्लाबोल

Google News Follow

Related

चित्रपट आणि डाव्या विचारसणीच्या लाेक बऱ्याच काळापासून भाजपशासित राज्यांवर हल्लाबाेल करत आहेत. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवरही जोरदार निशाणा साधला. याचा निषेध म्हणून अनेक लेखक आणि तथाकथित कलाकारांनी काँग्रेसच्या काळात मिळालेले पुरस्कार परत करून निषेध केला. त्याचाच परिणाम म्हणून आता भाजप नेत्यांनीही त्यांच्यावर पलटवार करण्यास सुरुवात केली आहे.

मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांनी चित्रपट कलाकार, पुरस्कार वापसी टोळीवर चौफेर हल्ला चढवला आहे. भाजपशासित राज्यांमध्ये कोणतीही घटना घडली की, शबाना आझमी, नसीरुद्दीन शाह, पुरस्कार परत करणारी टोळी गळे फाडायला लागतात. हे सर्व तुकडे-तुकडे टोळीचे स्लीपर सेल असल्याचा आराेप गृहमंत्री नराेत्तम मिश्रा यांनी केला आहे.
झारखंडमधील दुमका येथील अंकिता सिंगच्या हत्येवर शबाना आझमी, नसीरुद्दीन शाह यांनी एक शब्दही काढला नाही, त्याचप्रमाणे उदयपूरमधील कन्हैयालालच्या हत्येवरही मौन पाळले, असा आरोप गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत बाेलतना केला आहे. भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये एखादी घटना घडली की यांचे कंठ फुटायला सुरुवात हाेते. त्या वेळी, ते देशाच्या राहणीमानाच्या अभावाबद्दल ओरडत, गळा फाडायला लागतात.

हे ही वाचा:

केजरीवाल विसरले ती लिकर पॉलिसी

नवे नौदल चिन्ह, मोदी आणि पिवळे इतिहासकार

‘एनआयए’ने दाऊद इब्राहिमची लायकीच काढली

‘राज साहेब आपल्या परखड वक्तृत्वाची महाराष्ट्र वाट पाहतोय’

याशिवाय पुरस्कार वापसी टोळी ओरडायला लागते. हे सर्वजण तुकडे-तुकडे टोळीच्या स्लीपर सेलचे एजंट आहेत.
त्यांच्या कृतीतून आपली वाईट मानसिकता दर्शन घडत आहे. त्यांना सुसंस्कृत आणि धर्मनिरपेक्ष कसे म्हणता येईल. झारखंड आणि राजस्थानवर मौन बाळगणाऱ्यांचा पर्दाफाश झाला आहे. हे सगळे लोक फक्त भाजपला टार्गेट करत राहिले, आता या लाेकांचे पितळ देशात उघड झाले आहे असा टाेलाही त्यांनी लगावला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा