27 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरराजकारणगृहमंत्री फडणवीसांनी सांगितला पुणे अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम

गृहमंत्री फडणवीसांनी सांगितला पुणे अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम

विधानसभेत दिली माहिती

Google News Follow

Related

पुण्यात कल्याणीनगर येथे हिट अँड रनचे प्रकरण झाले होते. संपूर्ण राज्यात या प्रकरणामुळे खळबळ उडाली होती. अल्पवयीन मुलाने गाडी दोन जणांना ठोकल्यामुळे भीषण अपघात झाला होता. याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटले होते. यासंदर्भातला मुद्दा विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान गाजणार याची शक्यता असतानाच ठाकरे गटाचे सुरेश प्रभू यांनी हा मुद्दा उपस्थित केला. यानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावर सविस्तर निवेदन दिलं.

देवेंद्र फडणवीसांनी पुणे अपघात घटनेचे सर्व तपशिल विधानसभेत सांगितले. “पुणे अपघात प्रकरण गंभीर असून ही घटना १९ मे २०२४ रोजी रात्री २.३० च्या सुमारास घडली. त्यानंतर त्या मुलाला लोकांनी मारहाण केली. पुढे त्याला पोलीस ठाण्यात आणलं. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. पहिल्यांदा पोलिसांनी जो गुन्हा दाखल केला तो ३०४ अ होता. पण त्यानंतर वरिष्ठांनी भेट दिली आणि त्यांनी सांगितलं की, ३०४ अ नव्हे, ३०४ चाच गुन्हा दाखल केला पाहिजे. त्यामुळे त्याच दिवशी केस डायरीमध्ये ३०४ चा गुन्हा दाखल केला गेला,” असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

“ज्युवेनाईल जस्टिस बोर्डासमोर दाखल अर्जात स्पष्टपणे बाजू मांडण्यात आली आहे. संबंधित मुलाचा गुन्ह्यात सहभाग असल्याचं निष्पन्न झालं असून त्यानं निघृणपणे सदरचं कृत्य केलं आहे. त्याची जन्मतारीख १४ सप्टेंबर २००६ असून त्याचं वय १७ वर्षं ८ महिने इतकं झालं आहे. त्याच्या वयाचा विचार करता त्याला प्रौढ समजून ते न्यायालयाकडे वर्ग करावे अशी विनंती आहे, असं पोलिसांनी त्या अर्जात म्हटलं आहे.” अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली.

“निर्भयाच्या घटनेनंतर १७ वर्षांच्या वरचे जे आहेत आणि थंड डोक्याने त्यांनी एखादं कृत्य केल्याचं लक्षात आलं तर त्यांना प्रौढ मानता येतं याबाबतची तरतूद आहे. त्यानुसारच ही मागणी करण्यात आली होती. त्या बोर्डाच्या सदस्यांनी तो अर्ज दाखल करून घेतला. त्यानंतर त्याला काय शिक्षा दिल्या हे सगळ्यांना माहीत आहे. त्यानंतर लगेच पोलिसांनी त्यावर अपील दाखल केली. न्यायालयाने पोलिसांना सांगितलं की तुम्हाला रिव्ह्यूचा अधिकार आहे. त्यासाठी बोर्डाकडे याचिका दाखल केली, तेव्हा त्यांनी आपला जुना निर्णय बदलला आणि आरोपीला कोठडी दिली. आरोपीच्या रक्ताचा नमुना घेतला होता. जेव्हा त्या नमुन्यामध्ये अल्कोहोल नसल्याचं लक्षात आलं, तेव्हा पोलिसांना त्यात काही गडबड असल्याचं दिसलं. तेव्हा पोलिसांनी तात्काळ त्याचा डीएनए, त्याच्या वडिलांचा डीएनए आणि रक्ताच्या नमुन्याचा डीएनए तपासला. तो मॅच होत नसल्याचं समोर आलं. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित डॉक्टरांना अटक केली. त्यात एकानं ३ लाख रुपये घेऊन नमुना बदलल्याचं कबूल केलं,” अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात दिली.

“पहिलं आरोपपत्र दाखल करण्यात आलं. मुलानं जेव्हा ब्रेक मारला, तेव्हा लॉक झालेला वेग ११० किलोमीटर प्रतीतास एवढा आहे. त्यामुळे अत्यंत वेगानं तो कार चालवत होता. त्याच्या घरापासूनचं सीसीटीव्ही फूटेज जप्त करण्यात आलं आहे. तो आधी ज्या बारमध्ये बसला, जिथे दारू प्यायला त्याचं सीसीटीव्ही फूटेज जप्त करण्यात आलं आहे. दुसऱ्या बारमध्ये जिथे बसला, त्याचं सीसीटीव्ही फूटेज जप्त झालं आहे. त्यामुळे पुराव्यांमध्ये कुठेही कमतरता नाही,” अशी माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

हे ही वाचा:

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जामीन मंजूर

पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानभवनाच्या पायऱ्यांवर ‘एक अकेला मोदी, सब पे भारी’च्या घोषणा

२००९ मध्ये उद्घाटन केलेल्या टर्मिनल- १ च्या छताचा भाग कोसळल्याची नागरी उड्डाण मंत्र्यांची माहिती; काँग्रेसची बोलती केली बंद

नवीन संसद भवन आणि आता सेंगोल

“आरोपीच्या वडिलांवरही कारवाई करण्यात आली आहे. वडिलांनी मुलगा प्रौढ नसताना त्याला गाडी चालवायला देणं, या गुन्ह्यासाठी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. बार चालकांवरही कारवाई झाली आहे. त्याच्या आजोबांनी त्यांच्या ड्रायव्हरला हा गुन्हा अंगावर घेण्याची गळ घातली. पण पोलिसांनी ड्रायव्हरचं ऐकलं नाही. त्या आजोबांनी ड्रायव्हरला एक दिवस घरात कोंडूनही ठेवलं. पण त्यानं काही त्यांचं ऐकलं नाही. वडिल आणि आजोबांवर अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. ते अजूनही अटकेत आहेत”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा