मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह ह्यांनी अनिल देशमुखांच्यावर केलेल्या आरोपांमुळे राज्यभर खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलेल्या या पत्रात परमबीर सिंह यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. यातच खासदार मोहन डेलकर प्रकरणाच्या तपासाला वेगळे वळण देण्यासाठी गृहमंत्री पहिल्या दिवसापासून आग्रही असल्याचे म्हटले आहे.
महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे ह्याला दर महिन्याला १०० कोटी रुपये पोहोचवण्यास सांगितल्याचा दावा केला गेला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हा खळबळजनक दावा केला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे ह्याला वसुलीचे काम दिल्याचे या पत्रात म्हटले आहे. या व्यतिरिक्त खासदार मोहन डेलकर यांच्या विषयातही खळबळजनक दावा केला आहे.
हे ही वाचा:
गृहमंत्र्यांवर झालेल्या खंडणीच्या आरोपांनांतर मुख्यमंत्री क्वॉरेन्टाईन होण्याची शक्यता
पोलिस अधिकाऱ्याने राज्याच्या गृहमंत्र्यांवर खंडणीचे आरोप करणे ही अभूतपूर्व घटना – देवेंद्र फडणवीस
दर महा १०० कोटी पोहोचवण्याचे सचिन वाझेला गृहमंत्र्यांचे आदेश, परमबीर सिंह यांच्या आरोपांनी खळबळ
मुख्यमंत्र्यांनी आता १०० कोटींच्या वसुलीचा खुलासा करावा
खासदार मोहन डेलकर यांचा मृतदेह मुंबईतील हॉटेलात सापडल्यानंतर या विषयाला वेगळे वळण देण्यासाठी पहिल्या दिवसापासून गृहमंत्र्यांच्या दबाव असल्याचे या पत्रात म्हटले आहे. पहिल्या दिवसापासूनच या प्रकरणात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी गृहमंत्री अनिल दिशमुख आग्रही होते असे परमबीर यांनी म्हटले आहे. या प्रकरणात पहिलीपासून मारिन ड्राईव्ह पोलिसांनी योग्य तो तपास केला होता.
खासदार डेलकर यांच्या मृतदेहासोबत जे पत्र सापडले त्यात दादर आणि नगर हवेलीच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात लिहिले गेले आहे. पण गृहमंत्री पहिल्यापासूनच या प्रकरणात ढवळाढवळ करत होते. डेलकर यांच्या बाबतीत आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या काही घटना घडल्या असतील तर त्या दादरा आणि नगर हवेली मध्ये घडल्या आहेत. त्यामुळे त्यात कोणता तपास करायचाच असेल तर तो दादरा आणि नगर हवेली पोलिसांच्या अखत्यारीत येतो, मुंबई पोलिसांच्या नाही. पण तरीही गृहमंत्री आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करण्यासाठी आग्रही होते असा गौप्यस्फोट परमबीर सिंह यांनी केला आहे.