दर महा १०० कोटी पोहोचवण्याचे सचिन वाझेला गृहमंत्र्यांचे आदेश, परमबीर सिंह यांच्या आरोपांनी खळबळ

दर महा १०० कोटी पोहोचवण्याचे सचिन वाझेला गृहमंत्र्यांचे आदेश, परमबीर सिंह यांच्या आरोपांनी खळबळ

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे ह्याला दर महिन्याला १०० कोटी रुपये पोहोचवण्यास सांगितल्याचा दावा केला गेला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हा खळबळजनक दावा केला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे ह्याला वसुलीचे काम दिल्याचे या पत्रात म्हटले आहे.

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटीनने भरलेली स्कॉर्पिओ गाडी सापडल्यापासून महाराष्ट्रात रोज नवे गौप्यस्फोट होत आहेत. या प्रकरणात महाराष्ट्रातील गृहखात्याचा कुरूप चेहरा जनतेसमोर आला असून यात आता खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख यांचे नाव समोर येत आहे. अंबानींच्या प्रकरणात सचिन वाझेला अटक झाली, तर मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली करण्यात आली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील पोलिसांकडून चुका झाल्याचे आणि या बदल्या ‘रुटीन बदल्या’ नसल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता शनिवारी परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पात्र लिहून थेट गृहमंत्री देशमुख यांच्यावर आरोप केले आहेत. सचिन वाझे ह्याला स्वतः गृहमंत्र्यांनी दर महा १०० कोटी आणून देण्यास सांगितले होते असा दावा या पत्रात करण्यात आला आहे. या पत्रामुळे महाराष्ट्रात गृहमंत्र्यांच्या आशीर्वादाने पोलिसच खंडणीची एखादे रॅकेट चालवत होते का? असा सवाल उपस्थित होत आहे.

हे ही वाचा:

कुंपणावरचे कावळे… छोटे-मोठे!

मनसुख हिरेन प्रकरणाचा तपासही आता एनआयएकडे

मनसुख हिरेन यांच्या मृतदेहाच्या जागी अजून एक मृतदेह

अमेरिकेचे संरक्षणमंत्री भारतात

परमबीर सिंह यांनी या पत्राची प्रत उपमुख्यमंत्री आणि राज्यपालांनाही पाठवले आहे. दरम्यान अनिल देशमुख यांनी ट्विटरच्या माध्यमातून हे आरोप फेटाळले आहेत. परमबीर सिंह ह्यांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी माझ्यावर आरोप केले असल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे.

परमबीर सिंह यांच्या या आरोपांनंतर राज्यात खळबळ उडाली आहे. या आरोपांनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अनिल देशमुखांवर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष्य लगले आहे.

Exit mobile version