‘सावरकरांच्या देशप्रेम, त्यागावर शंका घेणाऱ्यांनो लाज बाळगा’

‘सावरकरांच्या देशप्रेम, त्यागावर शंका घेणाऱ्यांनो लाज बाळगा’

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या देशप्रेमावर शंका कुशंका घेणाऱ्यांवर गृहमंत्री अमित शहा यांनी निशाणा साधत म्हटले की, स्वातंत्र्यवीरांच्या देशभक्ती, त्याग आणि शौर्यावर शंका घेणाऱ्या लोकांना “थोडी लाज” वाटली पाहिजे. पोर्ट ब्लेअर येथील रा

पोर्ट ब्लेअरच्या राष्ट्रीय स्मारक सेल्युलर जेलमध्ये सावरकरांच्या प्रतिमेस अमित शहा यांनी पुष्पहार अर्पण केला. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्या कोठडीत हालअपेष्टा भोगल्या त्या कोठडीला भेट देऊन सावरकरांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
भारताच्या प्रदीर्घ स्वातंत्र्य संग्रामात शेकडो स्वातंत्र्यसैनिक या तुरुंगात कैद होते. शाह म्हणाले की, सावरकरांना वीर ही उपाधी कोणत्याही सरकारने दिली नाही. देशवासियांनी त्यांच्या देशप्रेम आणि शौर्याबद्दल त्यांना ती अर्पण केली आहे. सावरकरांकडे चांगल्या जीवनासाठी आवश्यक असलेले सर्व काही होते, परंतु त्यांनी कठीण मार्ग निवडला, जो मातृभूमीबद्दलची त्यांची अतूट बांधिलकी दर्शवितो.

भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या भाग म्हणून, सरकार ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करत आहे. याअंतर्गत एका कार्यक्रमाला संबोधित करताना शहा म्हणाले, ‘या सेल्युलर जेलपेक्षा मोठे कोणतेही तीर्थ असू शकत नाही. हे ठिकाण एक ‘महातीर्थ’ आहे, जिथे सावरकरांनी १० वर्षे अमानुष छळ सहन केला. परंतु त्यांनी धैर्य, शौर्य गमावले नाही. याच समर्थनार्थ त्यांना ‘वीर’ असे नाव दिले.

गृहमंत्री म्हणाले, “भारताच्या १३० कोटी लोकांनी त्यांना प्रेमाने दिलेली ही पदवी हिरावून घेतली जाऊ शकत नाही.”

राजनाथ सिंह यांनी अलीकडेच सावरकरांच्या टीकाकारांवर निशाणा साधला होता. वारंवार असे म्हटले जात आहे की, सावरकरांनी तुरुंगातून मुक्त होण्यासाठी ब्रिटिश सरकारपुढे दया याचिका दाखल केली होती. महात्मा गांधींनीच त्यांना दया याचिका दाखल करण्यास सांगितले, असे विधान यावेळी सिंह यांनी केले होते.

Exit mobile version