कर्नाटकात चार टक्के मुस्लिम आरक्षण लागू करण्याच्या काँग्रेस सरकारच्या हालचालीला त्यांनी घटनाबाह्य असल्याचा आरोप गृहमंत्री अमित शहा यांनी इंडिया टुडेच्या गोलमेज कर्नाटक कार्यक्रमत बोलतांना केला. काँग्रेस सरकारने संविधानाच्या विरोधात जाऊन मुस्लिम आरक्षणाची व्यवस्था केली पण आम्ही याला पूर्ण विराम देऊन इतर समाजाचे आरक्षण वाढविण्याचे काम केले असा जोरदार हल्ला अमित शहा यांनी काँग्रेसवर चढवला.
काँग्रेसवर टीका करताना गृहमंत्री शहा म्हणाले की, गेल्या ७० वर्षात काँग्रेसने एकाच देशात दोन देश निर्माण करण्याचे काम झाले.कर्नाटकातील भाजप सरकारने असंवैधानिक व्यवस्था संपवण्याचे, राज्यघटना सुव्यवस्थित आणण्याचे आणि ज्यांचा हक्क होता त्यांना ती देण्याचे काम केले असल्याचे स्पष्ट केले.
अमित शहा यांनी कर्नाटक निवडणुकीत भाजपच्या विजयाचा दावा करतानाच भ्रष्टाचाराच्या आरोप पूर्णपणे खोडून काढले. अमित शहा म्हणाले, हे आरोप पूर्णपणे निराधार आहेत. उल्टा चोर कोतवाल को डांटे या म्हणीसारखे आहे. काँग्रेसकडून आमच्यावर बिनबुडाचे आरोप केले जात आहेत.काँग्रेसने पीएफआयला संभाळलण्याचे काम केले असा आरोप करत पीएफआयला चाप लावण्याचे काम भाजपने केले असून त्याचा सर्वात जास्त फायदा कर्नाटकातील जनता आणि दक्षिण भारताला होईल असा दावा शहा यांनी यावेळी केला.
हे ही वाचा:
तब्बल चार कोटींचे आयफोन लंपास!
भगवान परशुराम ब्राह्मतेज, क्षात्रतेजाचे प्रतीक
अहो, उद्धव ठाकरे, तुमची ब्लू टीक नऊ महिन्यांपूर्वीच गेली…
कृतयुग किंवा त्रेतायुगाचा प्रारंभ म्हणजे अक्षय (अक्षय्य) तृतिया
पीएफआयच्या मुद्द्यावर भाजपला मते मिळऱ्यांच्या संदर्भातील एक प्रश्नाला उत्तर देतांनाअमित शाह म्हणाले की , विकास हा मुद्दा बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे. मागील निवडणूक आणि या निवडणुकीबाबतच्या प्रश्नावर ते म्हणाले की, यावेळी भाजपची स्थिती चांगली आहे आणि पूर्ण बहुमताने सरकार स्थापन होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.