23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारण'ठाकरे सरकारचे वर्तन हिटलर पद्धतीने'

‘ठाकरे सरकारचे वर्तन हिटलर पद्धतीने’

Google News Follow

Related

ठाकरे सरकार हिटलर पद्धीतीने वागत आहे. सरकार ज्या पद्धतीने गुंडशाही करत आहे, त्याविरुद्ध संघर्ष करणार असल्याचे आव्हान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. भोंग्यांच्या निर्णयासंबंधात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती. या बैठकीवर भारतीय जनता पार्टीने बहिष्कार टाकत पत्रकार परिषद घेतली. ज्या सर्वपक्षीय बैठकीला राज्याचे मुख्यमंत्रीच उपस्थित नाहीत, त्या बैठकीला का जायचे असा सवालही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

फडणवीस म्हणाले, गृहमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीचे आमंत्रण दिले होते. मात्र, राज्यात ज्या काही घटना घडत आहेत, त्यावरून या सरकारने कोणतीही चर्चेला जागा ठेवलेली नाही. तसेच ज्या सर्वपक्षीय बैठकीला राज्याचे मुख्यमंत्रीच उपस्थित नाहीत. ती बैठक काय टाईमपास करायला ठेवली आहे का? असा सवाल फडणवीसांनी केला. जर कोणी हिटलर पद्धीतीने वागत असेल तर आम्ही संघर्ष करायला तयार असल्याचे फडणवीसांनी सांगितले आहे.

ठाकरे सरकारच्या भ्रष्टाचारावर आम्ही बोलतो म्हणून,आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ले केले जात आहेत. मात्र यांना जर असे वाटतं असेल की, हल्ले केल्यावर आम्ही शांत बसू तर त्यांचा तो गैरसमज आहे, असे फडणवीस म्हणाले. पुढे ते म्हणाले, ठाकरे सरकारने आमच्या मुंबईतील पोलखोल रथावर हल्ले केले. किरीट सोमय्या सगळ्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढतात म्हणून त्यांच्यावर हल्ले केले जात आहेत. मोहित कंबोज यांच्यावरही मॉबलीचिंग करण्यात आले. मात्र आम्ही असल्या हल्ल्यांना घाबरणारे नाही. केरळमध्ये आमचे शेकडो कायर्कर्ते मारले गेले त्यावर आम्ही संघर्ष केला. त्यावेळी सुद्धा आम्ही घाबरलो नाही मविआ सरकारचा हा गैरसमज आहे की, त्यांनी हल्ले केले तर आम्ही त्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढणे थांबवू. तर तसे होणार नाही, कितीही हल्ले केले तरी आम्ही त्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढणार, असे फडणवीस म्हणाले.

कार्यकर्त्यांवर हल्ले होत आहेत याचे पोलिसांना माहिती असतानाही पोलीस काही करत नाहीत. एफआयआर नोंदवण्यास पोलीस मनाई करतात. सोमय्या यांच्यावर हल्ला झाला तो पोलिसांना माहिती असताना त्यांनी काही केले नाही. ज्यांना लोकशाही मान्य नाही, त्यांनी आमच्या रथावर हल्ला केला. राज्यात भाजपच्या नेत्यांना टार्गेट केले जात आहे. त्यांच्यावर खोट्या तक्रारी नोंदवल्या जात आहेत. यासाठी पोलिसांचा दुरुपयोग हे सरकार करत आहे. मात्र या बोगस तक्रारी पुढे काही तग धरत नाहीत, असेही फडणवीस म्हणाले.

हे ही वाचा:

निवृत्त केंद्रीय गृहसचिव डॉ. माधव गोडबोले यांचे निधन

कोल्हापूर न्यायालयात सदावर्तेंचा जामीन मंजूर

ही म्याव म्याव करणारी शिवसेना

सोमय्या यांच्यावरील हल्ल्यानंतर केंद्रीय गृहसचिव आवश्यक पावलं उचलणार

राणा दाम्पत्यांच्या आंदोलनात शिवसेची एक आजी सामील झाली होती. त्या आजीला भेटण्यासाठी मुख्यमंत्री स्वतः त्यांच्या घरी गेले. त्यावरून सुद्धा फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना धारेवर धरले आहे. तर म्हणाले, एसटी कामगारांनी आत्महत्या केली, शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, त्यांच्या कुटुंबाला भेटण्यास मुख्यमंत्री कधी गेले नाहीत. मात्र आंदोलनात सहभागी झालेल्या आजीला भेटण्यास ते गेले.

राणा दाम्पत्य हनुमान चालीसा पठणासाठी मुंबईत आले होते. मात्र त्यांना अटक करून त्यांच्यावर राजद्रोहाचे कलम १२४ लावले. जर हनुमान चालीसा लावल्याने राजद्रोहाचा कलम लावला जातोय तर आमच्यावर देखील लावा असे म्हणत, फडणवीसांनी स्वतः परिषदेत हनुमान चालीसा म्हणून दाखवली. तसेच आता आम्हला आता संघर्षाशिवाय पर्याय नसल्याचे फडणवीस म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा