पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज(२९ एप्रिल) सोलापुरात सभा पार पडली.सोलापूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचार सभेला पंतप्रधान मोदींनी संबोधित केले.पंतप्रधान मोदींनी मराठीतून आपल्या भाषणाची सुरुवात करत काँग्रेस आणि इंडी आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली.पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेसचा इतिहास कलंकित आहे तरीही देशाला काबीज करण्याचे स्वप्न ते बघत आहेत.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, माझ्या सोलापूरकरांना माझा मनापासून नमस्कार.जय जय राम कृष्ण हरी, पंढरपूरच्या पांडुरंगाला माझे नमन.सोलापूरकरांच्या प्रेमामुळे मी या वर्षी दुसऱ्यांदा सोलापूरमध्ये आलो आहे.जानेवारीमध्ये आलो होतो तेव्हा तुमचे हक्क पूर्ण करण्यासाठी काहीतरी घेऊन आलो होतो,काहीतरी देण्यासाठी आलो होतो.मात्र, आज आलो आहे ते तुमच्याकडून काहीतरी मागण्यासाठी.पुढे खूप काही देणार आहे म्हणून मी आज तुमच्याकडे आलो आहे.मला धन-दौलत नको मला तुमचे आशीर्वाद हवे आहेत आणि त्यासाठीच मी या ठिकाणी आलो आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
पुढील येणाऱ्या पाच वर्षांसाठी तुम्ही विकासाच्या गॅरंटीची निवड करा.दुसरीकडे, ते लोक आहेत ज्यांनी २०१४ च्या पूर्वी देशाला भ्रष्टाचार, आतंकवाद मध्ये ढकलून दिले होते.’आपला कलंकित इतिहास असून देखील काँग्रेस देशाला काबीज करण्याचे स्वप्न बघत आहे’.यांना अंदाज नाहीये की, लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्प्यात इंडी आघाडीचा डब्बा गोल झाला आहे.
ते पुढे म्हणाले की, इंडी आघाडीमध्ये नेत्यांच्या नावावरून महायुद्ध चालू आहे.इंडी आघाडी यांनी आता एक नवीन फॉर्मुला आणला आहे.पाच वर्षात पाच पंतप्रधान.प्रत्येक वर्षी नवीन पंतप्रधान आणि हे पंतप्रधान दरवर्षाला देशाला लुटण्याचे काम करत राहणार.दुसरीकडे नकली शिवसेना म्हणत आहे की, पंतप्रधान पदासाठी आमच्या पक्षात खूप नेते आहेत आणि त्यांचा रोज बडबडणारा नेता म्हणतो एका वर्षात आम्ही चार पंतप्रधान केले तर काय बिघडले.
तुम्हीच मला सांगा या फॉर्मुल्याने देश चालू शकेल का?.
हेही वाचा..
इंदूरमध्ये कॉंग्रेस उमेदवाराचा भाजपात प्रवेश
सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारला फटकारले
चेंगा बेंगा सामुहिक बलात्कारप्रकरणी ९ जणांना अटक
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ लोकलचा डबा घसरल्याने हार्बर मार्गाची वाहतूक ठप्प
त्यांना देशाची, तुमची चिंता नाहीये तर त्यांना फक्त मलाई खायची आहे.तुम्ही काँग्रेस काळ आणि भाजपचा केवळ १० वर्षाचा काळ पाहिला आहे.मागील १० वर्षाचा काळात सामाजिक न्यायासाठी जेवढे काम झाले तेवढे भारताच्या स्वातंत्र्यानंतर कधीच झाले नव्हते.काँग्रेसच्या ६० वर्षांच्या काळात एससी,एसटी,ओबीसी यांच्या हक्काला रोखण्याचे काम केले.त्यामागे त्यांची युक्ती होती, या मागासवर्गीयांना असेच ठेवायचे आणि व्होटबँकसाठी यांचा वापर करायचा.मात्र, आम्ही तसे केले नाही.
ते पुढे म्हणाले की, मला गरीबाच्या मुलाला-मुलीला डॉक्टर,इंजिनिअर बनवायचे आहे.कोणताही दलित, आदिवासी, ओबीसी पुढे जाऊ नये अशी काँग्रेसची विचारधारा होती.या काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या दलित नेत्याचा अपमान केला.मात्र, भाजपला २०१४ मध्ये जनतेने निवडून दिल्यांनतर भाजपने देशाच्या प्रमुख पदी दलित, आदिवासी लोकांना संधी दिली.
काँग्रेस आणि इंडी आघाडींच्या नेत्यांचा खरा चेहरा समोर आल्यामुळे त्यांचा तिळपापड झाला आहे.त्यांच्याकडे काहीच बोलायला नसल्यामुळे फक्त मोदीला शिव्या देण्याचे काम हे करत आहेत.शिव्यांची संपूर्ण डिक्शनरी उघडून ठेवली आहे.त्यांचे व्हिजन नाहीये मात्र आमच्याकडे आहे.ते पुढे म्हणाले की, आम्ही व्होटबँकसाठी कोणत्याही जातीचा वापर करत नाही, तशी आमची नीती नाहीये.
तसे असते तर मी माझ्या मागासवर्गीय लोकांसाठी २४ हजार करोडची पीएम जण-मन योजना बनवली नसती. माझ्या देशाच्या शेवटच्या नागरिकाला मला मजबूत बनवायचे आहे.एनडीए सरकारने मोदी सरकारने जम्मू काश्मीर मधून कलम-३७० हटवले.त्यामुळे सामाजिक न्यायाचा अधिकार तेथील लोकांना मिळाला.पंतप्रधान मोदींनी आपल्या कार्यकाळात केलेल्या कामाचा उल्लेख केला.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार जनतेसाठी दिवस -रात्र काम करत असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले.महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले.