उत्तराखंड पोटनिवडणूकीत पुष्कर धामी यांनी रचला इतिहास

उत्तराखंड पोटनिवडणूकीत पुष्कर धामी यांनी रचला इतिहास

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी चंपावत पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार निर्मला गहतोडी यांचा पराभव करत ५५ हजार मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे. धामी यांचा विधानसभा निवडणुकीत खटीमा मतदारसंघातून ६ हजार ५०० मतांनी पराभव झाला होता. त्यानंतर त्यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवले जाईल की नाही, असे प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र भाजपने या प्रकरणाला पूर्णविराम देत पुष्कर धामी यांना दुसरी संधी देण्याची घोषणा केली.

२०२२ मध्ये धामी दुसऱ्यांदा पक्षाला सत्तेत आणण्यात यशस्वी झाले. परंतु, खटीमा मतदारसंघात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. तरीही पक्षाने त्यांच्याकडे दुसऱ्यांदा सत्तेची सूत्रे सोपवली. मात्र, त्यांना सहा महिन्यांच्या अगोदर आमदार करणे आवश्यक होते. धामी यांनी चंपावत मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवून दणदणीत विजय मिळवला. ही जागा भाजपने कैलास गहातोडी यांना दिली होती. त्यानंतर येथे पोटनिवडणूकीत पुष्कर धामी यांनी विजय मिळवून इतिहास रचला आहे.

आतापर्यंत उत्तराखंडात इतक्या प्रचंड मतांनी विजय नोंदवला गेले नसल्याचे सांगण्यात येत आहे. पुष्कर सिंह धामी ५५ हजार मतांनी विजयी झाले आहेत. यापूर्वी विजय बहुगुणा सितारगंजमध्ये ३९ हजार मतांनी विजयी झाले होते. उत्तराखंडच्या राजकीय इतिहासावर नजर टाकली तर पुष्कर सिंह धामी हे पाचवे मुख्यमंत्री आहेत जे पोटनिवडणुकीत उतरले होते. यावेळी धामी यांच्यासमोर काँग्रेसच्या निर्मला गहातोडी होत्या. गहातोडी यांना ३ हजार १४५ मते मिळाली.

हे ही वाचा:

‘ज्वलंत हिंदुत्वाचे प्रवक्ते औरंगजेबाच्या कबरीवर डोके टेकवणाऱ्या टिकैत यांचा निषेध करतील का?’

‘जनतेला दिलासा फुटकळ बाब; मंत्र्यांना नव्या गाड्या, बंगले महत्त्वाचं’

राहुल गांधींना ईडीचे पुन्हा समन्स

… म्हणून तुर्की आता तुर्किये नावाने ओळखला जाणार

धामी यांचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही प्रचार केला. योगी यांच्याशिवाय केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, अनुराग ठाकूर यांसारख्या अनेक दिग्गज नेत्यांनी पुष्कर सिंह धामी यांच्यासाठी प्रचार केला होता. चंपावत पोटनिवडणुकीसाठी ३१ मे रोजी मतदान झाले होते. यामध्ये ६१ हजार ५९५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

Exit mobile version