पाकिस्तानातील ऐतिहासिक मंदिराची धर्मांधांकडून नासधुस

पाकिस्तानातील ऐतिहासिक मंदिराची धर्मांधांकडून नासधुस

पाकिस्तानातील रावळपिंडीच्या पुराना किला भागातील ७४ वर्षे जुन्या मंदिराची काही धर्मांध मुसलमानांकडून तोडफोड करण्यात आली. रविवारी सकाळी घडलेल्या या घटनेबाबत बानी गाला पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली गेली असल्याचे स्थानिक पोलिस प्रशासमनाकडून सांगण्यात आले आहे.

याबाबत प्रशासनाने सांगितले की या मंदिराचे गेल्या महिन्यापासून दुरूस्तीचे आणि पुनर्बांधणीचे काम सुरू होते. त्यामुळे या देवळात कोणत्याही प्रकारचे धार्मिक विधी केले जात नव्हते, त्याचप्रमाणे या मंदिरात कोणत्याही मुर्ती देखील नव्हत्या.

हे ही वाचा:

राठोड, देशमुख यांच्यानंतर आव्हाडांचा नंबर?

दिल्लीच्या सीमांवर आंदोलकांची उपस्थिती कमी व्हायला सुरूवात

औरंगाबादमधील लॉकडाऊन रद्द; इम्तियाज जलिल यांच्या मिरवणुकीत कोरोना नियमांचा फज्जा

सय्यद रझा अब्बास, सहाय्यक सुरक्षा अधिकारी, इव्हॅक्यु ट्रस्ट प्रॉपर्टी, नॉर्थ झोन, रावळपिंडी यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार दहा ते बारा लोकांच्या जमावाने देवळाची दारे आणि जिन्यांचे नुकसान केले, त्यामुळे देवळाच्या बांधकामावर परिणाम झाला आहे.

मंदिर प्रशासक ओम प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेनंतर त्यांच्या घरासमोर आणि मंदिरासाठीच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

मुस्लिम बहुल देशातील हिंदु मंदिर उध्वस्त होण्याची ही पहिली वेळ नाही. यापुर्वी देखील असे प्रकार पाकिस्तानात घडले आहेत.

पाकिस्तानातील हिंदु समाजाने त्यांच्या धार्मिक स्थळांचे संरक्षण करण्याची आणि त्यांना त्यांचे धार्मिक विधी पार पाडण्यासाठी सुरक्षा उपलब्ध करून देण्याची मागणी सरकारकडे केली आहे.

डिसेंबर २०२० मध्ये खैबर पख्तुनख्वा प्रांतातील ऐतिहासिक स्थळाचे देखील अशाच प्रकारे नुकसान झाले. त्यामुळे सरकारला हस्तक्षेप करून या ऐतिहासिक स्थळाचे केवळ संरक्षणच नव्हे, तर त्याची पुनर्बांधणी देखील करावी लागली होती.

सातत्याने किडनॅपिंग, प्राणघातक हल्ले यांसारख्या अमानुष प्रकारांचा सामना पाकिस्तानातील हिंदु समाजाला सातत्याने करावा लागल्याने, जागतिक पातळीवरून पाकिस्तानची कठोर निंदा करण्यात आली होती.

Exit mobile version