भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत , उद्धव ठाकरे परिवाराच्या १९ बंगले घोटाळा प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती दिली आहे. शिवाय उद्धव ठाकरे यांना ‘हिसाब तो देना पडेगा’ असे म्हणून इशारा सुद्धा दिला आहे. किरीट सोमय्या यांनी ट्विटमध्ये एफआयआर क्रमांक २६ नुसार आयपीसी कलम ४२०, ४६५, ४६६, ४६८, आणि ३४ या प्रमाणे ग्रामविकास अधिकारी संगीता भांगरे यांनी हा गुन्हा नोंदवला आहे.
कोर्लई ग्रामपंचायत अधिकाऱ्यांविरुद्ध फसवणूक आणि १९ बंगल्यांच्या रेकॉर्डमध्ये फेरफार करणे यासंबंधी संगीता भांगरे यांनी तक्रार दाखल केल्याचे सोमय्या यांनी म्हंटले आहे.
Uddhav Thackeray Family
19 Bunglows ScamFIR registered yesterday at Revdanda Alibag Police Station
FIR No 26, IPC Section 420, 465, 466, 468 & 34
Block Devt Officer Mrs Sangita Bhangre filed complaint against Korlai Gram Panchayat
"Uddhav Thackeray ji Hisab to Dena Hoga" pic.twitter.com/XmKFtg9ZtD
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) February 24, 2023
२०२३ या वर्षाच्या सुरवातीलाच किरीट सोमय्या यांच्या कोण कोण निशाण्यावर आहेत यासंबंधी त्यांनी एक यादीच जाहीर केली होती. त्याचवेळेस ठाकरे कुटुंबाचे १९ बंगले ,अस्लम शेख यांचे ४९ स्टुडिओ , हसन मुश्रिफ , किशोरी पेडणेकर यांचे मुंबई महापालिकेतील घोटाळे, तर अनिल परब यांचे साई रिसॉर्ट इत्यादींचा समावेश त्या यादीत होता.
हे ही वाचा:
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भावी मुख्यमंत्र्यांची मांदियाळी
मोदींबाबत अपशब्द वापरणारे पवन खेरा शरण आले; मागितली बिनशर्त माफी
एनआयएची मोठी कारवाई, ८ राज्यात ७६ ठिकाणी छापे
दीड लाखांची ब्रँडेड चप्पल, महागड्या जीन्स.. गुंड सुकेश चंद्रशेखरची गजाआड मजा
काय आहे प्रकरण ?
अन्वय नाईक यांनी २००९ मध्ये ग्रामपंचायतीच्या परवानगीने १९ बंगले बांधले होते. २००९ ते २०१३ अशा प्रत्येक वर्षी त्यांनी नियमितपणे ग्रामपंचायतीला घरपट्टी भरली होती. २०१४ मध्ये ठाकरे आणि वायकर परिवाराने अन्वय नाईक यांच्याकडून सदर बंगले जमिनीसह स्वतःच्या नावे विकत घेतले होते, असे किरीट सोमय्या यांनी म्हंटले आहे. ठाकरे परिवाराने या १९ बंगल्यांची घरपट्टी २०१३ ते २०२१ या आठ वर्षांची भरली असून ११ नोव्हेंबर २०२० ला हा घोटाळा उघडकीस आला.
त्यानंतर ठाकरे सरकार आणि मुख्यमंत्री कार्यालयाने अलिबाग, रायगड जिल्ह्यतील शासकीय अधिकाऱ्यांवर दबाव टाकून या बंगल्यांच्या नोंदी शासकीय दस्तऐवजांमधून काढून टाकण्यात आल्या. म्हणूनच रश्मी ठाकरे यांच्या या व्यवहारांची चौकशी व्हायला हवी. ज्याप्रमाणे अनिल परब यांच्या रिसॉर्टची चौकशी करून त्यावर कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणे रश्मी ठाकरे विरोधात चौकशीची मागणी किरीट सोमय्या करत आहेत.