हिंदुस्थान पोस्टच्या पत्रकार साखी गिरी यांनी राहुल गांधींना मुंबई दौऱ्यादरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल प्रश्न विचारला पण तेव्हा काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना धक्काबुक्की करत बाजुला ढकलले. राहुल गांधी त्यावेळी गाडीत बसून होते मात्र त्यांनी पत्रकाराला धक्काबुक्की होत असल्याचे पाहूनही मौन धारण करणे पसंत केले. भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी महाराष्ट्रात आहेत. मुंबईत शिवतीर्थावर त्यांची सभा होणार आहे त्यानंतर या यात्रेचा समारोप होणार आहे. त्यासाठी ते मुंबईत आलेले असताना शिवाजी पार्क परिसरात त्यांची रॅली आलेली होती. सदर महिला पत्रकाराने बूमसह राहुल गांधींच्या गाडीजवळ जात त्यांना सवाल केला. पत्रकाराने विचारले की, वीर सावरकरांचा आपण जो अपमान केलात त्याबद्दल आपण माफी मागणार का, शिवाजी पार्कवर जी सभा आपण घेत आहात तिथे आपण पुन्हा सावरकरांचा अपमान करणार का? मात्र राहुल गांधींच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करताना त्या पत्रकाराला धक्का देऊन बाजूला केले गेले.
चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दर्शन घेतल्यानंतर राहुल गांधी गाडीत बसत असताना त्यांना पत्रकाराने हा प्रश्न विचारला. पण त्यांच्या गाडीजवळ असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्या पत्रकाराला बाजुला ढकलले. एरवी महिलांच्या प्रतिष्ठेबद्दल बोलणाऱ्या राहुल गांधी यांना या महिला पत्रकाराशी केल्या जात असलेल्या धक्काबुक्कीबद्दल काहीही वाटले नाही. उलट त्यांनी मौन साधणेच पसंत केले, असे व्हीडिओत दिसत आहे.
एवढेच नाही तर साखी गिरी यांच्याभोवती असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी गोदी मीडिया गोदी मीडिया असे ओरडत त्यांना अपमानित करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्या पत्रकाराने स्पष्ट शब्दांत सांगितले की, मी गोदी मीडिया नाही, पत्रकार आहे. मला राहुल गांधी यांना प्रश्न विचारण्याचा हक्क आहे.
हे ही वाचा:
उद्धव ठाकरेंना गुडबाय; आमदार आमशा पाडवी एकनाथ शिंदेकडे!
यूट्यूबर एल्विश यादवला नोएडा पोलिसांनी केली अटक!
हत्या झालेला पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या आईने लहान मुलाला दिला जन्म!
आयपीएल २०२४चा संपूर्ण हंगाम भारतातच!
या सगळ्या धक्काबुक्की प्रकरणावर भाजपाचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी नेहमीप्रमाणे तिखट शब्दांत टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मंदबुद्धी, चिनी चाकर, हिंदूद्रोही राहुल गांधी यांच्या समर्थकांचा आणखी एक कारनामा. हिंदुस्थान पोस्टच्या महिला पत्रकाराला धक्काबुक्की. हेच असते का अभिव्यक्तिचे स्वातंत्र्य???
मंदबुद्धी, चीनी चाकर, हिंदूद्रोही राहुल गांधी यांच्या समर्थकांचा आणखी एक कारनामा. हिंदुस्तान पोस्टच्या महीला पत्रकाराला धक्काबुक्की.
हेच असते का अभिव्यक्तिचे स्वातंत्र्य??? pic.twitter.com/9HtLegIA72— Atul Bhatkhalkar (मोदी का परीवार) (@BhatkhalkarA) March 17, 2024
काँग्रेसकडून नेहमीच अभिव्यक्ती स्वातंत्र्य, पत्रकारांवरील हल्ले याबद्दल बोलले जाते पण यावेळी या पत्रकाराशी केलेले गैरवर्तनाबद्दल त्यांच्याकडून प्रतिक्रिया आलेली नाही. शिवाय, पत्रकार संघटनांनाही अशा एखाद्या व्हीडिओनंतर पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची आठवण होते. त्यांच्याकडूनही या महिला पत्रकाराला झालेल्या धक्काबुक्कीबद्दल एकही शब्द किंवा एखादे पत्रक आलेले नाही.