हिंदू बांधव दहीहंडी साजरी करणार म्हणजे करणारच

हिंदू बांधव दहीहंडी साजरी करणार म्हणजे करणारच

“हिंदू बांधव दहीहंडी साजरी करणार म्हणजे करणारच.” असं म्हणत भाजपा आमदार राम कदम यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहीहंडीला परवानगी दिलेली नसल्यामुळे हिंदू समाज हा संतापलेला आहे. भाजपाने या मुद्द्यावरून ठाकरे सरकारला घेरायला सुरवात केली आहे. भाजपा आमदार आणि मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर, भाजपा आमदार आशिष शेलार यांनीही या मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

दहीहंडी होणारच. घरात बसुन सबुरीचे सल्ले आम्हाला नकोत. बार उघडता, त्यांना नियम लावता, आणी हिन्दू सणांना विरोध? आम्ही दहीहंडी करणारच.” असं ट्विट राम कदम यांनी केलं आहे. याचबरोबर त्यांनी त्या ट्विटमध्ये एक व्हिडिओही जोडला आहे. ज्यामध्ये ते असं म्हणत आहेत की, “काही गोविंदा पथकं महाराष्ट्राच्या सरकारला भेटण्याचा प्रयत्न करतायत. सर्व गोविंदा पथकांची इच्छा आहे की या वेळचा उत्सव त्यांना जोरात, धुमधडाक्यात साजरा करता यावा. यावेळची दहीहंडी यामाहाराष्ट्रातल्या हिंदू विरोधी सरकारने कितीही रोखली, तरी आम्ही थांबणार नाही. आम्ही दहीहंडी ही साजरी करणार म्हणजे करणारच. हिंदूंच्या उत्सव येतात तेंव्हा आम्हाला सबुरीचे सल्ले आणि इतरांचे उत्सव येतात तेंव्हा त्यांना परवानगी? हा दुटप्पी न्याय कसा? बिअर बार, दारूचे ठेके उघडताना त्यांच्यासाठी नियम बनवता. तसे कोणते नियम तुम्ही तयार करणार असाल तर आम्ही त्या नियमांचं स्वागत करू, पालन करू. पण तुम्ही नियम बनवणार नसाल आणि एअर कंडिशन्ड बंगल्यामधून सांगणार असा, दहीहंडी साजरी करायची नाही, तर हिंदू बांधव ऐकणार नाही. आम्ही दहीहंडी साजरी करणार म्हणजे करणारच.”

हे ही वाचा:

उद्धव ठाकरेंचा मोगली वरवंटा हिंदू समाजावर चालतोच आहे

लसीचे दोन्ही डोस घेऊनही दहीहंडीला परवानगी नाहीच

जातिनिहाय जनगणनेबाबत लवकरच निर्णय

महेश मांजरेकरांना कर्करोगाचे निदान

गोविंदा पथकांनी मुख्यमंत्र्यांकडे काही मागण्या केल्या आहेत तर काही आश्वासनं ही दिली आहेत. “आम्हाला आमच्या जागेवरची मानाची दहीहंडी फोडण्यास परवानगी मिळावी. दहीहंडी फोडताना मानवी मनोरे उभारण्यासाठी सर्व गोविदांचे दोन्ही लसीकरण पुर्ण करणे आवश्यक आहे. तशी तयारी गोविंदा पथकांनी केली आहे. गोविंदा पथक हे दुसरीकडे कोठेही दहीहंडी फोडण्यासाठी जाणार नाहीत. कोविड १९ संसर्गाची जाणिव ठेवूनच सुरक्षित दहीहंडी उत्सव आम्हाला आमच्या जागेवरच करण्याची परवानगी द्यावी. दहीहंडी फोडताना कोणतीही गर्दी होणार नाही याची काळजी गोविंदा मंडळं घेतील.

Exit mobile version