मुस्लिम शिक्षकांना वेगळे करून काश्मीरात हिंदू, शीख शिक्षकांची हत्या

मुस्लिम शिक्षकांना वेगळे करून काश्मीरात हिंदू, शीख शिक्षकांची हत्या

काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांनी गुरुवारी एक हिंदू आणि एका शीख शिक्षकाची गोळ्या झाडून हत्या केली त्यापैकी एक शाळेचे मुख्याध्यापक होते. दोन्ही शिक्षक दहशतवादी हल्ल्यात जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

जम्मू -काश्मीर पोलिसांनी सांगितले की, हे दोन्ही शिक्षक श्रीनगरच्या ईदगाह संगम परिसरात असलेल्या शासकीय उच्च माध्यमिक शाळेत कार्यरत होते. त्यापैकी एकाचे नाव सुखविंदर कौर, तर दुसऱ्याचे नाव दीपक असे होते.

मुख्याध्यापकांच्या कार्यालयात चार ते पाच शिक्षकांची बैठक सुरु होती. किमान दोन दहशतवाद्यांनी कार्यालयात प्रवेश केला आणि दहशतवाद्यांनी मुस्लिम शिक्षकांना वेगळे करून मुख्याध्यापकासह दोन बिगर मुस्लिम शिक्षकांना शाळेबाहेर ओढले. त्यानंतर त्यांनी शाळेच्या आवारात त्यांच्यावर गोळीबार केला आणि घटनास्थळावरून पळ काढला. सुरक्षेच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी डीजीपीसह उच्च पोलीस अधिकारी शाळेत पोहोचले आहेत.

“नागरिकांना लक्ष्य करण्याच्या या अलीकडील घटना काश्मीर खोऱ्यात भीतीचे वातावरण, सांप्रदायिक तणाव निर्माण करण्यासाठी आहेत. स्थानिक आचार आणि मूल्यांना लक्ष्य करण्याचे आणि स्थानिक काश्मिरी मुस्लिमांना बदनाम करण्याचे हे षडयंत्र आहे. हे पाकिस्तानातील एजन्सींच्या निर्देशानुसार केले जात आहे.” असं जम्मू -काश्मीर डीजीपी दिलबाग सिंह म्हणाले.

हे ही वाचा:

अखेर उघडले दार…

देशभर सुरु आदिशक्तीचा जागर

NCB वर निशाणा साधण्यासाठी नबाब मलिकना ड्रग्ज माफीयांनी सुपारी दिली आहे काय?

‘शीख हत्यांकाडास जबाबदार असणाऱ्यांची सहानुभूती नको!’

उपराज्यपाल मनोज सिन्हा म्हणाले की, “हल्ल्यामागे असणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले जाईल.  दहशतवादी आणि त्यांचे संरक्षक जम्मू -काश्मीरची शांतता, प्रगती आणि समृद्धी भंग करण्यात यशस्वी होणार नाहीत.”

Exit mobile version