25 C
Mumbai
Thursday, January 2, 2025
घरक्राईमनामामहाराष्ट्रात हिंदूंची दुकाने जाळली जात आहेत

महाराष्ट्रात हिंदूंची दुकाने जाळली जात आहेत

Google News Follow

Related

“न घडलेल्या घटनेचे निषेध मोर्चे राज्यात निघत आहेत. यात हिंदूंची घरे जाळजी जात आहेत. हे धोकादायक असून, हे सरकारने गांभीर्याने घ्यायला हवं.” असे आवाहन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नागपूरमध्ये बोलत असताना केले आहे.

फडणवीस म्हणाले की, त्रिपुरा येथील कथित घटनेच्या निषेधार्थ अमरावती जिल्ह्यात मोर्चे काढण्यात आले. या मोर्चांनी वेगळेच वळण घेतले आहे. त्यात हिंदूंची घरे जाळजी जात आहेत. दुकाने टार्गेट केली जात आहेत. सोशल मीडियावर टाकलेल्या चुकींच्या फोटोमुळे हे मोर्चे काढण्यात येत आहेत. हे थांबायला हवे. शांतता राखणे गरजेचे आहे, असे आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केले. फडणवीस म्हणाले की, त्रिपुरामध्ये मशीद तोडल्याचे आणि जाळल्याचे फोटो प्रसिद्ध करण्यात आले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या चुकीच्या फोटोमुळे हे आंदोलन करण्यात येत आहे. हे आंदोलन पेटवण्याचा प्रयत्न होत आहे. या घटनेचा आम्ही निषेध करतो. न घडलेल्या घटनेवरून होणाऱ्या आंदोलना हा प्रकार सरकारने गांभीर्याने घ्यावा. खरे तर शुक्रवारनंतर शनिवारीही अमरावतीमध्ये मोर्चे निघतच आहेत. यामुळे हिंसक वळण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून मोर्चेकऱ्यांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज केल्यानंतर पाण्याचा मारा करावा लागला. अमरावतीत चांगलेच वादंग निर्माण झाले आहे. हे आंदोलन पेटवण्याचा प्रयत्न होत आहे. शांतता राखणे गरजेचे आहे. आम्ही कुठल्याही दंगलीचे समर्थन करत नाही. सर्वांनी शांतता पाळावी, असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, अमरावतीत आज कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. काल घडलेल्या हिंसाचारातील दोषींवर आधी कारवाई करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी येथील भाजपा नेत्यांनी केली आहे. त्याशिवाय रस्त्यावर उतरलेला जमाव पांगणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. तसेच राज्यातील सरकारविरोधात सर्व पक्षांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन भाजपा नेत्यांनी केले आहे.

हे ही वाचा:

सपा, बसपा, काँग्रेस एकत्र आले तरी भाजपाच जिंकणार

‘रझा अकादमीवर बंदी घाला’

दुबळ्या राज्यकर्त्यांमुळे दंगेखोरांचे मनोधैर्य वाढले

अनिल परब शरद पवारांच्या भेटीला

दरम्यान, आज अमरावतीत नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी कलम १४४ लागू केले आहे. आज सकाळी अमरावतीत मोठ्या संख्येने जमावाने रस्त्यावर उतरत घोषणाबाजी केली. तर शहरातील राजकमल चौक परिसरातील एका टपरीलाही एका जमावाने आग लावली. या टपरीतील सामान आधी काढून घेण्यात आले होते. मात्र, भर बाजारातील या टपरीला आग लावल्याने परिसरात धूर आणि आगीचे मोठे लोट उठताना दिसत होते. दरम्यान हा प्रकार थांबवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधूराचा वापर केला. त्यानंतर जमाव पांगला गेला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा