राजस्थानमधील अलवरमध्ये १९ वर्षीय हिंदू मुलाची मुस्लिम जमावाने मारहाण करून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या मुलाला रुग्णालयात नेण्यात आले होते जेथे रविवारी त्याचा मृत्यू झाला.
योगेश जाटव असे या तरुणाचे नाव आहे. जाटव यांच्या मृत्यूमुळे संतापलेल्या कुटुंबीयांनी आणि स्थानिकांनी आंदोलन केले. आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली. आंदोलकांनी ५ तासांहून अधिक काळ अलवर-भरतपूर रस्ता रोखून ठेवल्याने वाहतूक कोंडी झाली.
MOB LYNCHING HORROR IN RAJASTHAN'S ALWAR
A 19-year-old man was thrashed by a group of people after his motorcycle hit a #woman, #died at a hospital here on Sunday, police said.#Moblynching #Alwar #Rajasthan pic.twitter.com/t7AjjD2GLG
— Mirror Now (@MirrorNow) September 20, 2021
ही घटना बुधवारी घडली, जेव्हा किशोर आपल्या गावी भरतपूरकडे जात होता. यावेळी, त्याच्या दुचाकीने ८ वर्षांच्या मुलीला कथितरीत्या धडक दिली पण तिला कोणतीही मोठी दुखापत झाली नाही. स्थानिक लोक मात्र या घटनेमुळे संतापले आणि त्यांनी जाटव यांच्यावर हल्ला केला.
मुस्लिम जमावाने काठीने या तरुणाला मारहाण केली आणि जोपर्यंत तो बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला तोपर्यंत ते थांबले नाहीत. त्यानंतर त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी योगेश जाटवला जयपूरच्या एसएमएसमध्ये पाठवले जिथे त्याने अखेरचा श्वास घेतला.
वैद्यकीय मंडळाने शवविच्छेदन केले आणि किशोरचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. पोलिसांनी सांगितले की त्यांनी या प्रकरणाच्या संदर्भात दोन एफआयआर दाखल केले आहेत. एक एफआयआर मुलीच्या कुटुंबीयांनी दाखल केला आहे तर दुसरा मृतकाच्या कुटुंबीयांनी दाखल केला आहे.
हे ही वाचा:
तक्रारदार स्थानबद्ध तर गावगुंड राज्यभर मुक्त
रश्मी ठाकरे यांच्या नावाने अलिबागमध्ये १९ बंगल्यांचा घोटाळा
एसपी गौतम यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास डीएसपी, लक्ष्मणगड, राजेश शर्मा यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. तिने सांगितले की तपास सुरू आहे आणि आरोपींना लवकरात लवकर पकडले जाईल. या घटनेनंतर भाजपचे माजी आमदार ज्ञानदेव आहुजा यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आणि राज्य सरकारला पीडित कुटुंबाला नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.