मोदी या आडनावावरून बदनामी केल्यानंतर अवमान प्रकरणी सूरत कोर्टातून २ वर्षांची शिक्षा झालेल्या राहुल गांधींना आता आणखी एका न्यायालयाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा आता राहुल यांच्या विरोधात अवमानना याचिका दाखल करणार आहेत. मुख्यमंत्र्यांचे नाव अदानीसोबत जोडल्यामुळे हिमंता बिस्व सरमा संतप्त झाले आहेत.
अदानी प्रकरणामध्ये हिमंता बिस्वा सरमा यांचे नाव जोडण्यासाठी राहुल गांधी यांनी ADANI नावाचे प्रत्येक अक्षर वापरले. यामध्ये काँग्रेसच्या अशा ५ नेत्यांची नावे लिहिली होती, ज्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे किंवा जे काँग्रेसमध्ये नाहीत.
राहुल गांधी यांनी अदानी या नावातील आद्याक्षरांचा उपयोग करत पाच नेत्यांची नावे लिहिली होती. त्यात गुलाम नबी आझाद, ज्योतिरादित्य सिंदिया, किरण रेड्डी, हिमांता बिस्वसर्मा आणि अनिल अँटनी यांच्या नावांचा समावेश आहे. हे ट्विट करून राहुल गांधी यांनी अदानी यांचा या नेत्यांशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला.
यासंदर्भात मुख्यमंत्री हिमंता सरमा म्हणाले की, अदानीसोबत आपले नाव जोडणे हे अवमानाचे कृत्य असल्याचे आहे. ’राहुल यांनी जे काही ट्विट केले आहे ते अपमानास्पद ट्विट आहे. पंतप्रधान मोदींचा दौरा झाल्यानंतर आपण आसाम न्यायालयात खटला दाखल करणार आहे. येत्या १४ एप्रिलनंतर राहुल गांधींविरोधात खटला दाखल करणार असल्याचा इशारा आसामचे मुख्यमंत्री सरमा यांनी दिला.
हे ही वाचा:
…तर अजित पवारांची गणना अंधभक्तांत होईल!
लिट्टेला सक्रिय करण्याचा कट , एनआयएची छापेमारी, मोठ्या प्रमाणावर रोकड ,ड्रग्ज जप्त
शरद पवारांनी केली विचारवंत, पुरोगाम्यांची कोंडी
कर्नाटक स्पोर्टिंगने जिंकली पद्माकर तालीम शिल्ड
राहुल गांधी यांनी कर्नाटकच्या प्रचारसभेत मोदी आडनावाचे सगळेच चोर कसे असतात, असा प्रश्न विचारल्यानंतर त्याविरोधात गुजरातमध्ये खटला दाखल झाला. त्यावरून गुजरातच्या दंडाधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांना २ वर्षांची शिक्षा सुनावली. त्यामुळे त्यांची खासदारकीही गेली आहे. आता हा नवा वाद राहुल गांधी यांनी ओढवून घेतला आहे.