लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल रोजी होणार आहे.दरम्यान, सत्ताधारी आणि विरोधकांची टोलेबाजी अधिक तीव्र झाली आहे.याच मालिकेत आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना “अमूल बेबी” असे संबोधून त्यांची खिल्ली उडवली आहे.ते म्हणाले की, राज्यातील लोक भाऊ आणि बहिणींला त्यांच्या निवडणूक प्रचार कार्यक्रमात पाहण्याऐवजी ” काझीरंगातील वाघ आणि “गेंडा” पाहण्यास पसंत करतील.
मंगळवारी (१६ एप्रिल) प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, “आसामचे लोक गांधी कुटुंबाचे ‘अमूल बेबीज’ पाहण्यासाठी का जातील? ते काझीरंगा येथे जाऊन वाघ आणि गेंडे पाहण्यास प्राधान्य देतील.”सोमवारी (१५ एप्रिल) जोरहाटमध्ये काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांच्यासोबत प्रियंका गांधींचा प्रचार कार्यक्रम पार पडला.यावर मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आले.त्यावर ते म्हणाले की, जास्त काही महत्वाचे नाही…माझ्या माझ्या माहितीनुसार, फक्त दोन हजार ते तीन हजार लोक कार्यक्रमाला उपस्थित होते.
हे ही वाचा..
जॉस बटलरच्या वादळात केकेआर गारद!
युपीएससी परीक्षेत बॅडमिंटनपटू कुहू गर्गने मारले मैदान
टी-२० विश्वचषकात रोहित-विराट करणार सलामीला
राहुल गांधींच्या रामनवमी शुभेच्छांमध्ये प्रभू श्री रामांच्या फोटोचा विसर
असम के लोग गांधी परिवार के “Amul Babies” को देखने क्यों आयेंगे?
इससे अच्छा वह जंगल में घूमें और वहाँ विभिन्न जानवरों को देख कर आनंद उठायें। pic.twitter.com/bnL8uqjHjJ
— Himanta Biswa Sarma (Modi Ka Parivar) (@himantabiswa) April 16, 2024
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, पत्रकारांशी बोलताना आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना भेटण्यासाठी कोण येणार? लोक वाघ आणि गेंडे पाहण्यासाठी काझीरंगा येथे जातील.गांधी कुटुंबाला पाहून काही फायदा होणार आहे, ते भावंडे ‘अमूल बेबी’ आहेत.ते फक्त अमूलच्या मोहिमेसाठी योग्य वाटतात.ते तर अमूल बेबी आहेत. अमूलच्या बाळाला पाहण्याऐवजी गेंडा बघायला जा, ते अधिक फायदेशीर ठरेल.
दरम्यान,गेल्या सोमवारी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी निवडणूक प्रचारादरम्यान आसाममध्ये पोहोचल्या होत्या. यादरम्यान त्यांनी जोरहाट शहरातील जोरहाट लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार खासदार गौरव गोगोई यांचा प्रचार केला होता.