राहुल म्हणजे एकदिवस सद्दाम, दुसऱ्या दिवशी अमूल बेबी

हिमंता बिस्वसर्मा यांनी उडवली खिल्ली

राहुल म्हणजे एकदिवस सद्दाम, दुसऱ्या दिवशी अमूल बेबी

आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांनी कर्नाटकात प्रचारसभा घेताना राहुल गांधी यांच्यावर टीका केली. ते एक दिवस सद्दाम दिसतात, तर दुसऱ्या दिवशी अमूल बेबी. ते स्वत: राजकारणात किती काळ राहतील, याची शाश्वती नाही. त्यामुळे कर्नाटकमधील काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर कितपत विश्वास ठेवायचा, अशा शब्दांत त्यांनी खिल्ली उडवली.

भाजपच्या स्टार प्रचारकांपैकी एक असलेल्या हिमंता बिस्वा सरमा यांनी रविवारी कर्नाटकच्या जनतेला संबोधित करताना, ‘आयटी, बायोटेक्नॉलॉजी आणि कृषी क्षेत्रातील दिग्गजांना काँग्रेसच्या गॅरंटीची गरज नाही’, असे निक्षून सांगितले. राहुल गांधी म्हणजे राजकारणाचीच गॅरंटी नसलेली व्यक्ती असे लेबल लावत सरमा म्हणाले, ‘मला सांगा राहुल गांधींची ‘गॅरंटी’कोण घेणार? ते उत्तर प्रदेशातील निवडणुका हरले आणि केरळला गेले. एके दिवशी त्याचा चेहरा सद्दाम हुसेनसारखा दिसतो तर, दुसऱ्या दिवशी अमूल बेबीसारखा होतो.’

कर्नाटकमधील सत्ता भाजपकडून हिसकावून घेण्यासाठी काँग्रेसने जोर लावला आहे. राहुल गांधी यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक कोटी रुपये आणि कल्याण कर्नाटक प्रदेशासाठी पाच हजार कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. काँग्रेसने दिलेल्या आश्वासनांची चर्चा झाली तरी निवडणूक जाहीरनाम्यात बजरंग दलावर बंदी घालण्याच्या दिलेल्या आश्वासनाची अधिक चर्चा झाली.

हे ही वाचा:

‘द केरळ स्टोरी’बद्दल चांगलं लिहिलं म्हणून तरुणाला केली मारहाण

‘द केरळ स्टोरी’च्या टीमचे आयुष्य पूर्वीसारखे राहणार नाही, असं विवेक अग्निहोत्री का म्हणाले?

लष्करी परेडवर केलेल्या हल्ल्याबद्दल तेहरानमध्ये इराणी-स्विडिश नागरिकाला फाशी

ऑनलाइन घोटाळे करण्यासाठी केली होती एक हजार लोकांची तस्करी

सरमा यांनी काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यावर टीका करताना, ‘काँग्रेसचा जाहीरनामा हा तुष्टीकरणाच्या राजकारणाचा दस्तऐवज आहे. आता पीएफआयची बजरंग दलाशी बरोबरी केली जात आहे, ज्याचा निषेध केला पाहिजे. बजरंग दलाला कोणत्याही प्रकारे देशविरोधी किंवा अतिरेकी संघटना म्हणून संबोधले जाऊ शकत नाही,’ असे ते म्हणाले. कर्नाटक काँग्रेसचे प्रमुख डीके शिवकुमार यांनी सरमा यांचा डीएनए काँग्रेसचा आहे, अशी टीप्पणी केली होती. या वक्तव्याचाही सरमा यांनी समाचार घेतला. ‘माझ्या धमन्यांमधून वाहणारे रक्त माझ्या आई-वडिलांचे, राज्याचे आणि देशाचे आहे. काँग्रेसचे नाही’, असे ते म्हणाले.

Exit mobile version