‘राहुल गांधी पवारांविरोधात ट्वीट करण्याची हिंमत दाखवतील काय?’

हिमंता बिस्वसर्मा यांनी दिले आव्हान, मुलाखतीत उपस्थित केला होता प्रश्न

‘राहुल गांधी पवारांविरोधात ट्वीट करण्याची हिंमत दाखवतील काय?’

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी बुधवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडले. काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी ज्या उद्योगपतीवर सातत्याने टीका करतात, त्याच गौतम अदानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याच्या पार्श्वभूमीवर ‘राहुल गांधी यांनी शरद पवारांविरोधात ट्वीट करून दाखवावे’, असे आव्हान त्यांनी दिले आहे.

काँग्रेस सातत्याने गौतम अदानी यांच्या कथित घोटाळ्याची चौकशी संयुक्त संसदीय समितीतर्फे केली जावी, अशी मागणी करत असताना नुकतीच शरद पवार यांनी यास हरकत दर्शवली होती. संयुक्त संसदीय समितीऐवजी सर्वोच्च न्यायालयाची समिती योग्य ठरेल, असे त्यांचे मत होते. त्यामुळे वादाचे मोहोळ उठले असतानाच अदानी यांनी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याचे वृत्त आले. याचा हवाला देत सरमा यांनी राहुल गांधी यांना हे आव्हान दिले आहे.

‘राहुल गांधी ट्वीट करतात की आम्ही अदानींचे मित्र आहोत. खरे तर मी त्यांना ओळखतही नाही. आम्हा ईशान्य भारतीय लोकांना अदानी, अंबानी आणि टाटांपर्यंत पोहोचायला वेळ लागेल. काहीही असो… आम्ही तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतु शरद पवार यांच्या विरोधात ट्वीट करण्याचे धाडस राहुल गांधी यांच्याकडे आहे का? शरद पवार यांचे अदानींशी काय संबंध आहेत, हे ते विचारतील का? हेच सोयीचे राजकारण आहे,’ अशी टीका सरमा यांनी एका परिषदेत केली.

हे ही वाचा:

एकलव्य खाडेचे वेगवान शतक; एजिस फेडरल वेंगसरकर अकादमी विजयी

फडणवीसांचे सोडा, तुम्हाला साळवींचे अंतरंग तरी कळतात का?

प्रकल्प नकोत बेरोजगारीही नकोमग हवंय काय कोकणाला?

‘लढाऊ’ शिवांगी राफेलमधून घडवणार इतिहास

‘तुम्ही भाजप आणि अदानीविरोधात ट्वीट करता परंतु जेव्हा गौतम अदानी शरद पवारांच्या घरी जाऊन तिथे दोन ते तीन तास व्यतीत करतात, तेव्हा राहुल गांधी ट्वीट का करत नाहीत? शरद पवार आणि अदानींच्या भेटीवर माझा काहीही आक्षेप नाही,’असेही त्यांनी स्पष्ट केले.

राहुल गांधी यांनी नुकत्याच केलेल्या ट्वीटमध्ये हिमंत बिस्व सरमा, गुलाब नबी आझाद या माजी काँग्रेसनेत्यांची नावे घेऊन त्यांचा अदानींशी संबंध जोडला होता. ‘ते सत्य लपवतात, म्हणूनच ते दररोज दिशाभूल करतात,’ असे ट्वीट त्यांनी केले होते. त्यावर सरमा यांनी राहुल गांधी यांच्यावर बदनामीचा खटला दाखल करण्याचा इशारा दिला होता. या बदनामीच्या खटल्याबाबतही त्यांनी भाष्य केले. ते ट्वीट राहुल गांधी यांनी स्वत: केले का, याबाबत त्यांना खात्री नाही, असेही ते म्हणाले. ‘एका वरिष्ठ काँग्रेस नेत्याने मला सांगितले की, राहुल गांधींना कदाचित माहीतही नसेल की त्यांनी काय ट्वीट केले आहे. कदाचित कोणीतरी त्यांच्या वतीने ट्वीट केले असेल,’ असेही ते म्हणाले.

Exit mobile version