गुजरात आणि कर्नाटक नंतर आता हिमाचल प्रदेशमध्ये सुद्धा शाळेतून भगवद्गीता शिकवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हिमाचल प्रदेश मधील भारतीय जनता पार्टीच्या सरकारने हा निर्णय घेतला आहे. हिमाचलचे शिक्षण मंत्री गोविंद सिंग ठाकूर यांनी यासंबंधीची घोषणा केली आहेत
आगामी शैक्षणिक वर्षात इयत्ता नववी ते बारावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना भगवद्गीता शिकवण्यात येईल. हा एक स्वतंत्र विषय म्हणूनच त्याची सुरुवात केली जाणार आहे. रविवार, ३ एप्रिल रोजी हिमाचल प्रदेशचे शिक्षण मंत्री गोविंद सिंह ठाकुर यांनी मंडी परिसरात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना हा निर्णय जाहीर केला.
हे ही वाचा:
‘काही लोकांचा नखं कापून शहीद होण्याचा प्रयत्न’
माननीय बाळासाहेब, जमल्यास उद्धवजींना हिंदूंबाबत सुबुद्धी द्या
‘संजय राऊत, मुख्यमंत्री ठाकरेंना पुरावे द्या; टाईमपास करून वेळ घालवू नका’
भाजपा स्थापना दिन; देशभरातून निघणार शोभायात्रा
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकुर यांनी याबाबतच्या सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले. तर भगवद्गीता ही संस्कृत आणि हिंदी अशा दोन भाषांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवली जाईल असेही त्यांनी जाहीर केले. सर्व धर्मातील लोकांनी भगवद्गीता या प्राचीन हिंदू ग्रंथात सांगितलेली नैतिक मूल्य आणि सिद्धांत यांचा स्वीकार केला आहे. त्यामुळेच आम्ही विद्यार्थ्यांना भगवद्गीता शिकवण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
गेल्या महिन्यात सर्वप्रथम गुजरात सरकारचे शिक्षण मंत्री जीतू वाघानी यांनी विद्यार्थ्यांना भगवद्गीता शिकवण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी देखील कर्नाटकमध्ये भगवद्गीता शिकवण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगितले. तर आता हिमाचल प्रदेश मधील भाजपा सरकारने याबाबत निर्णय घेतला आहे.