काँग्रेसला झटका; हिमाचल प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतिभा सिंह यांची लोकसभा निवडणुकीतून माघार

हिमाचलमधील काँग्रेसची परिस्थिती पाहता घेतला निर्णय

काँग्रेसला झटका; हिमाचल प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतिभा सिंह यांची लोकसभा निवडणुकीतून माघार

लोकसभा निवडणूकीचे रणशिंग फुंकण्यात आले असून सर्वच पक्षांनी आता विजयासाठी कंबर कसली आहे. अशातच काँग्रेसला हिमाचल प्रदेशमधून जोरदार झटका बसला आहे. हिमाचल प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतिभा सिंह यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे.

खासदार प्रतिभा सिंह यांनी जाहीर केले की, त्यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी पत्रकारांना सांगितले की, “मी राज्याच्या प्रत्येक भागात व्यापक दौरा केला असून एकही कार्यकर्ता सक्रिय नसून अशा परिस्थितीत यश मिळणे कठीण असल्याचे आढळून आले आहे. पक्षाची परिस्थिती अशी नाही की, मंडीतून निवडणूक लढवता येईल. संघटनेत नाराजी असून कार्यकर्ते सक्रिय नाहीत.”

प्रतिभा सिंह म्हणाल्या की, “पक्षातून निलंबित करण्यात आलेल्या सहा आमदारांच्या रूपाने आमच्यासमोर नवीन आव्हान आहे. पोटनिवडणूक होणार आहे. या सहा जागांवर निवडणूक होणार असून त्या सर्व आम्हाला जिंकायच्या आहेत. त्यामुळेच मी मंडीतून उमेदवारी मागे घेतली. पूर्वी परिस्थिती खूप वेगळी होती. लोकसभा निवडणूक जिंकण्याला प्राधान्य दिले. पक्षासाठी मी अनेकदा मंडईला भेट दिली आहे आणि मला माझ्या मतदारसंघातील सर्व कानाकोपऱ्याची चांगली माहिती आहे.”

प्रतिभा सिंह म्हणाल्या की, “तुम्ही फक्त एमपी लोकल एरिया डेव्हलपमेंट (एमपीएलएडी) योजनेचा निधी वितरित करून निवडणूक जिंकू शकत नाही. विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या विजयासाठी परिश्रम घेतलेल्या कार्यकर्त्यांना जबाबदारी आणि महत्त्व दिले असते तर ते तळागाळात सक्रिय झाले असते,”

हे ही वाचा:

डीपफेक प्रकरणी इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांना हवीय घसघशीत नुकसान भरपाई!

“आमच्याकडे दोन रुपयेही नाहीत” बँक खाती गोठवल्यानंतर काँग्रेसची रडारड

चॅट जीपीटी म्हणतं, यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई आणि मुंबईचा संघ चमकणार

केंद्राने रोहिंग्यांना राहण्याचा अधिकार नाकारला

हिमाचल प्रदेशमध्ये राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राज्यसभा निवडणुकीच्या वेळी भाजपा उमेदवाराचा विजय आणि दुसरे म्हणजे काँग्रेसच्या सहा नेत्यांच्या बंडखोरीमुळेही काँग्रेसचे मोठे नुकसान झाले आहे. अशा स्थितीत हिमाचलमधील काँग्रेसची परिस्थिती पाहता पक्षाच्या ताकदीमुळे निवडणूक न लढवण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

Exit mobile version