हिमाचलचे हर्ष महाजन यांचा भाजपमध्ये प्रवेश

काँग्रेसला मोठा धक्का

हिमाचलचे हर्ष महाजन यांचा भाजपमध्ये प्रवेश

हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने काँग्रेसला आणखी एक धक्का दिला आहे. काँग्रेस दिशाहीन आणि नेतृत्वहीन झाल्याची टीका हिमाचल प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष हर्ष महाजन यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी दिल्लीत पक्षात प्रवेश केला.

“मी ४५ वर्षे काँग्रेसमध्ये होतो. पक्षाकडे ना दूरदर्शीपणा राहिलाय ना कार्यकर्ते . तळागाळातील कार्यकर्ते नाहीत अशी टीका महाजन यांनी केली आहे महाजन हे हिमाचल प्रदेश राज्य सरकारचे माजी मंत्री आहेत. ते माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे निकटवर्तीय मानले जात. सिंह यांचे गेल्याच वर्षी निधन झाले.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा आणि केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी हर्ष महाजन यांना पक्षात पूर्ण सन्मान दिला जाईल, असे सांगितले. हर्ष महाजन २००३-०८ या काळात वीरभद्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते.

हे ही वाचा:

नवरात्र २०२२: सप्तशृंगी गडावर, देवीचा जागर

सिंधुदुर्ग चिपी विमानतळाला माजी खासदार बॅ. नाथ पै यांचे नाव

मोदी सरकारचा मोठा निर्णय, पीएफआय संघटनेवर पाच वर्षांसाठी बंदी

आणि हेमाची ‘लता’ झाली!

हर्ष महाजन हे १९९३ ते २००७ या काळात चंबा विधानसभा मतदारसंघातून तीनदा आमदार होते. २००७ पासून महाजन यांनी माजी मुख्यमंत्री दिवंगत वीरभद्र सिंह यांच्या निवडणुकीची जबाबदारी सांभाळली आहे. १९९३ मध्ये पहिल्यांदा आमदार झालेले महाजन तत्कालीन सरकारमध्ये मुख्य संसदीय सचिव होते. १९९८ मध्ये त्यांची प्रदेश काँग्रेसच्या मुख्य व्हिप म्हणून निवड झाली.

Exit mobile version