हिमाचल प्रदेश ठरले १०० टक्के लसीकरण करणारे पहिले राज्य

हिमाचल प्रदेश ठरले १०० टक्के लसीकरण करणारे पहिले राज्य

कोविडच्या जागतिक महामारी विरोधात सुरू असलेल्या लढाईत भारताने आजवर अनेक विक्रम रचले आहेत. केंद्र सरकार आणि विविध राज्य सरकारे मिळून कोविड महामारी विरूद्धच्या या लढाईत समर्थपणे काम करताना दिसत आहेत. अशातच या लढाईला बळ देणारी एक सकारात्मक बातमी पुढे आली आहे. हिमाचल प्रदेश या राज्यातील सर्व नागरिक हे शंभर टक्के लवंत झाले आहेत. या विक्रमाला गवसणी घालणारे हिमाचल प्रदेश हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे. सध्याच्या घडीला हिमाचल हे एकमेव असे राज्य आहे ज्या राज्यातील शंभर टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. हा आकडा लसीकरणास पात्र असलेल्या नागरिकांचा आहे. सध्या भारतात १८ वर्षावरिल सर्व नागरिक हे लसीकरणास पात्र आहेत.

हे ही वाचा:

‘मिलिंद नार्वेकर म्हणजे आत्ताचे नवे शिवसेनाप्रमुख का?’

विक्रमवीर अजाझ पटेलने एमसीएला दिली ही अनोखी भेट

चैत्यभूमीवर अनुयायी आक्रमक; दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदला!

शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष स्वीकारणार हिंदू धर्म…वाचा सविस्तर

रविवार, ५ डिसेंबर, रोजी हिमाचल प्रदेश राज्याने या विक्रमाला गवसणी घातली. हिमाचल राज्याने केलेल्या विक्रमा सोबतच सध्याच्या घडीला भारतात लसीकरणासाठी पात्र असलेल्या नागरिकांपैकी ५० टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. सध्या भारताने १२७ कोटीपेक्षा अधिक कोविड विरोधातील लसी दिल्या आहेत.

हिमाचल प्रदेश राज्याच्या या कामगिरीसाठी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील हिमाचल प्रदेश सरकारचे आणि नागरिकांचे अभिनंदन केले आहे. ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Exit mobile version