उडुपीतील कॉलेजच्या एका मुलीने केली पोलखोल
कर्नाटकातील उडुपीच्या कॉलेजमध्ये हिजाबवरून झालेल्या वादंगात ज्या आलिया असादी या मुलीने आपल्या मैत्रिणींसोबत हिजाबसाठी हट्ट धरणारे आंदोलन केले, त्यांची पोलखोल त्याच कॉलेजमधील एका तरुणीने केली आहे.
या मुलीने आपली ओळख न सांगता असे म्हटले आहे की, या मुली ज्युनियर कॉलेजच्या पहिल्या वर्षात हिजाब घालत नव्हत्या पण त्यांनी यंदा ३१ डिसेंबरपासून हिजाबसाठी आंदोलन करण्यास सुरुवात केली. ३१ डिसेंबरआधी या मुली वर्गात हिजाब न घालताच बसत असत.
रिपब्लिक टीव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीत या मुलीने कन्नड भाषेत आपले मत मांडले आहे.
ज्युनियर कॉलेजच्या पहिल्या वर्षात या मुली हिजाब घालत नसत. तेव्हा गणवेश सक्तीचाच होता. कॉलेजमध्ये त्यांना हिजाब घालता येत असे पण वर्गात हिजाबला बंदी होती. कॉलेजमध्ये येताना या आंदोलनकर्त्या मुली हिजाब घालत असत आणि घरी जाताना पुन्हा हिजाब घालत. आम्हाला सर्वांनाच गणवेशासंदर्भात नियमांची माहिती देण्यात आली होती. त्यांनीही त्या अटी व नियम मान्य केले होते. त्यावेळी कोणताही वाद उत्पन्न झाला नव्हता. पण ३१ डिसेंबरला त्या मुलींनी अचानक कॉलेज प्रशासनाकडे आम्ही हिजाब घालणारच अशी मागणी करण्यास सुरुवात केली.
या मुलीने रिपब्लिकच्या पत्रकाराला असेही सांगितले की, प्रारंभी १२ मुलींनी या आंदोलनात भाग घेतला होता. त्यातील ६ मुलींनी नंतर माघार घेतली. आमच्या या सरकारी कॉलेजमध्ये अनेक गरीब मुले शिकत आहेत. आमचे प्राचार्यदेखील कुणाबद्दलही भेदभाव करत नाहीत.
हे ही वाचा:
किरीट सोमय्यांचा भाजपकडून पुण्यातल्या त्याच पायऱ्यांवर सत्कार
‘करदात्यांच्या पैशाच्या कुरणात तिन्ही पक्ष चरतात’
किरीट सोमय्या हल्ला प्रकरणी दोन पोलीस कर्मचारी निलंबित
‘ही तर संजय राऊतांची कोल्हेकुई’
हे प्रकरण कर्नाटकात सुरू झाल्यानंतर आज देशभरात विविध राज्यांत त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. एक आंतरराष्ट्रीय कारस्थान असल्याप्रमाणे या प्रकरणातल्या घडामोडी दिसत आहेत. पाकिस्तान, अफगाणिस्तानातूनही हिजाब समर्थनार्थ ट्विट केली जात आहे. तालिबानी गोळ्यांनी जखमी झालेल्या मलाला युसूफजाई हिनेदेखील हिजाबचे समर्थन केले आहे. पण तिच्या स्वतःच्या पुस्तकात मात्र बुरखा हा जणू ओव्हन असतो असे विधान तिने केले आहे. तिच्या या ढोंगीपणाबद्दल तिच्यावर टीका होत आहे.