शिवसेना-राष्ट्रवादीची ठाण्यात ‘लसी’ खेच

शिवसेना-राष्ट्रवादीची ठाण्यात ‘लसी’ खेच

लसीकरणाचे श्रेय घेण्याची रस्सीखेच आणि बॅनरबाजी या कारणांमुळे ठाणे महानगर पालिकेत महाविकास आघाडीतीलच दोन घटक पक्षांमध्ये राडा झाला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी थेट महापौर नरेश म्हस्के यांच्या दालनात घुसून राडा घातला. यामुळे ठाणे महानगरपालिकेत शिवसेनेच्याच शैलीत राष्ट्रवादीने कारवाई केल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

राष्ट्रवादीने लावलेले लसीकरणाचे बॅनर शिवसेनेने फाडल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला होता. आज राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे आणि महापालिकेतील विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी महापौर दालनात जाऊन महापौर नरेश म्हस्के यांना निवेदन दिले. त्यांनी लसीकरण मोहिमेच्या कॅम्पवरून आणि बॅनरबाजीवरून महापौरांना जाबही विचारला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते नजीमबुल्ला यांनी लसीकरणासाठी २० लाखांचा धनादेश दिला. मात्र, महापौरांनी धनादेश घेण्यास नकार दिला. त्यानंतर महापौरांनी राष्ट्रवादीने दिलेलं निवेदन घेण्यासही नकार दिला.

हे ही वाचा:

डेरा सच्चा सौदाच्या गुरमित रामराहीमचा जन्म जाणार तुरुंगात

उदय सामंत, गडाख, अब्दुल सत्तार हे काय १९६६ पासूनचे शिवसैनिक आहेत का?

काँग्रेसच्या बैठकीत सरदार पटेल यांचा पुन्हा अपमान

काय आहे इस्रायमधल्या ‘मायबोली’ मराठी मासिकाची कथा?

पाचपाखाडीला २२ नंबर रोड आहे. तिथे आम्हाला कॅम्प घ्यायचा होता. ठाण्यात शिवाजी मैदानात महोत्सवही घ्यायचा होता. त्याचं निवेदन द्यायला आम्ही महापौरांकडे गेलो होतो. शनिवारी महापौरांनी एक निवेदन काढलं होतं. यावेळी त्यांनी लसीकरणासाठी स्टेज वगैरे लागतं, त्याचा खर्च स्थानिक मंडळ करतं, असं महापौर म्हणाले होते. त्यामुळे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी २० लाखाचा चेक पाठवला होता. १०-१- लाखांचे असे दोन चेक होते. ते आम्ही द्यायला गेलो होतो. दहा लाख रुपये कोपरी पाचपाखाडीसाठी खर्च करण्याचे सूचवले होते. मात्र, त्यांनी चेक घेण्यास नकार दिला, असं आनंद परांजपे यांनी सांगितलं.

Exit mobile version