मुंबई उच्च न्यायालयाने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या आणि परमबीर सिंह यांच्यासह इतर सर्व याचिकांवरील निकाल ५ एप्रिल पर्यंत राखून ठेवला आहे. या याचिकांमध्ये गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
यापूर्वी कोर्टाने ३१ मार्च रोजी आपला निकाल राखून ठेवला होता.
या याचिकेमध्ये परमबीर सिंह यांनी यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केलेल्या सर्व आरोप पुन्हा एकदा सांगितले होते. त्याशिवाय अनिल देशमुख हे पोलिस तपासात अडथळा निर्माण करत असल्याचे देखील सांगितले होते.
हे ही वाचा:
आज रात्री ८:३० वाजता मुख्यमंत्री लाईव्ह, लॉकडाऊनची घोषणा करणार?
सचिन वाझे प्रकरणात आता एका महिलेची एंट्री
पुण्यातील संचारबंदीला भाजपाचा विरोध
सिंह यांनी यापूर्वी सर्वोच्च न्यायलयात धाव घेतली होती. परंतु त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना प्रथम उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले होते.
अँटिलिया स्फोटकांच्या प्रकरणामध्ये परमबीर सिंह यांची मुंबईच्या पोलिस आयुक्त पदावरून बदली करण्यात आली होती. या बदलीवरून देखील त्यांनी न्यायलयात दाद मागितली आहे.
बदली झाल्यानंतर परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले होते. या पत्रात सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा वर भ्रष्टाचार समावेश असल्याचे अतिशय गंभीर आरोप केले होते.