राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे मनी लॉन्ड्रींग प्रकरणात तुरुंगात आहेत. मात्र त्यांना विधानपरिषद निवडणुकीत मतदान करता यावे, यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालायने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे.
सोमवार, २० जून रोजी म्हणजेच आज विधानपरिषदेचे नुकतेच मतदान पार पडले. यावेळी काही मिनिटांआधीच मलिक आणि देशमुखांच्या मतदान हक्कावर सुनावणी झाली आहे. विधानपरिषदेत मतदान करता यावे म्हणून नवाब मलिक आणि अनिल देशमुखांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने आरोपीला मतदान करता येणार नाही, असे म्हणत त्यांची याचिका फेटाळून लावली होती. त्यांनतर मलिक आणि देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
मात्र त्यांनी ही याचिका उशिरा दाखल केली असल्याचे न्यायालयात युक्तिवाद करण्यात आला. तसेच मुंबई उच्च न्यायालयाने जो निकाल दिला तोच निकाल कायम असल्याचे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. यावेळी मलिक आणि देशमुखांच्या वकिलाने वेगवेगळे दाखले देऊन त्यांची बाजू मांडली होती. मात्र सर्वोच्च न्यायालायने तुम्ही उशिरा का याचिका दाखल केली, असे म्हणत त्यांना फटकारले आहे.
हे ही वाचा:
धक्कदायक! सांगली जिल्ह्यात एकाच कुटुंबातील नऊ जणांची आत्महत्या
मुख्यमंत्रीपद वाचविण्यासाठी बळी जाणार मिशिवाल्या मावळ्याचा!
‘अग्निवीराला शिस्त, कौशल्ये रोजगारक्षम बनवेल’
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या निर्णायक सामन्यात पावसाची खेळी; मालिका बरोबरीत सुटली
मतदानाला काही मिनिटे शिल्लक असताना जरी याचिका मान्य केली तरी त्याचा काही उपयोग नाही असं देखील न्यायालयात म्हटले आहे. राज्यसभा निवडणुकीत मतदान करता यावे यासाठीही त्यांनी याचिका केली होती. मात्र तेव्हाही न्यायालयाने त्याची याचिका फेटाळली होती. दरम्यान, विधानपरिषदेचे मतदान पूर्ण झाले असून, पाच वाजता निकाल जाहीर होणार आहे.