23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणतळई येथे शासनाकडून उशिराने मदतकार्य

तळई येथे शासनाकडून उशिराने मदतकार्य

Google News Follow

Related

रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळई गावात दरड कोसळण्याची घटना शुक्रवारी दुपारी समोर आली. या दुर्घटनेत आत्तापर्यंत ३६ जणांचे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या कारभारावर टीकास्त्रही डागले आहे.

कोकणातल्या पूर परिस्थितीची माहिती मिळताच भारतीय जनता पार्टीचे नेते कोकणाच्या दिशेने निघाले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री गिरीश महाजन, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या सह भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी कोकणला जाण्यासाठी कूच केली आहे. सध्या ते तळई या ठिकाणी पोहोचले आहेत. तळई गावातील दरड कोसळण्याच्या दुर्घटनेत प्रचंड नुकसान झाले आहे. सध्या एनडीआरएफची या ठिकाणी बचावकार्यात लागली आहे.

शुक्रवारी विरोध पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी तळई गावात जाऊन नुकसानाचा आणि मदतकार्याचा आढावा घेतला. तर त्याचवेळी ठाकरे सरकारवरही त्यांनी हल्ला चढवला आहे. “काल सायंकाळी ४ वाजता ही घटना घडली आहे, ४ वाजल्यापासून आज दुपारपर्यंत प्रशासनाचा एकही अधिकारी, साधा गावाचा तलाठी सुद्धा पोहोचला नाही. आज सांगतात संपर्क साधू शकत नाही नेटवर्क प्रॉब्लेम आहे. परंतु दळणवळणाला चालना देत महाड येथून बोटीने येण्याची आवश्यकता होती. एनडीआरएफची टीम उशिरा पोहोचली. ठाणे येथून तरुण मुलं मदतीला आली, दिलासा देण्याचं काम त्या तरुणांनी केल, ग्रामस्थांना स्थलांतर करत त्यानं तेथून बाहेर काढले आणि दिलासा दिला.” असे दरेकर म्हणाले.

हे ही वाचा:

संरक्षण क्षेत्रात मोदी सरकारकडून ‘ही’ नवी सुधारणा

मुख्यमंत्री स्वत: गाडी चालवत कोकणच्या दिशेने निघाले का?

लडाखच्या विकासासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

गोवंडीत इमारत कोसळून तीन जणांचा बळी

प्रशासकीय अधिकारी वेळेत न येणे ही शरम वाटणारी गोष्ट आहे असा घणाघात दरेकर यांनी केला. “अनेक दिवसापासून हवामान अधिकाऱ्यांनी रेड अलर्ट दिला असून आम्ही सुद्धा सांगितलं होते की, कोकणात सुविधा बळकट करा, त्यांना अगोदरच स्थलांतरित करण्यात आले नाही त्यामुळे हे जीव गेले. अगोदरच जर टीम आली असती तर आज हे निष्पाप जीव वाचले असते.”

सरकार मदत म्हणून ५ लाख देतील, १० लाख देतील परंतु त्याने गेलेले जीव परत येणार नाही असा घणाघात दरेकरांनी केला आहे. तर नंतर मदत करण्यापेक्षा पंचनामे करून घ्या, मदत पुरवा. खाण्याची आणि पिण्याची व्यवस्था करा असे आवाहनही प्रविण दरेकर यांनी राज्य सरकारला केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा