जम्मू- काश्मिरातून कलम ३७० हटवण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या २० हून अधिक याचिकांवर मंगळवार, ११ जुलै सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय आगामी २ ऑगस्टपासून नियमित सुनावणी करणार असल्याचे न्यायालयाने सांगितले.
कलम ३७० वर सर्वोच्च न्यायालयात तीन वर्षांनंतर सुनावणी होणार आहे. यापूर्वी २०२० मध्ये पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने या प्रकरणाची सुनावणी केली होती. तेव्हा न्यायालयाने म्हटले होते की, आम्ही हे प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे वर्ग करत नाही. सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी झालेल्या सुनावणीच्या एक दिवस आधी सोमवारी केंद्राने याप्रकरणी नव्याने प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. जम्मू- काश्मीरला तीन दशकांपासून दहशतवादाचा सामना करावा लागत असल्याचे केंद्राने म्हटले होते. तो संपवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे कलम ३७० हटवणे हाच होता.
हे ही वाचा:
पाकमधून आलेल्या सीमा हैदरने सोडली चिकन बिर्यानी, करू लागली तुळशीची पूजा
जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटन टॉपला; दहशतवादी संघटनांमधील भर्तीही झाली कमी
मार्ग मोकळा झाला; विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांची लवकरच नियुक्ती
विक्रम मोडत ‘बाईपण भारी देवा’ सिनेमाने एका दिवसात केली ‘एवढी’ कमाई
सरन्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड म्हणाले की, न्यायालय २ ऑगस्टपासून सकाळी १०.३० वाजता या याचिकांवर सुनावणी करेल. तसेच सोमवार आणि शुक्रवार वगळता आम्ही दररोज ३७० च्या याचिकांवर सुनावणी करू असे न्यायालयाने स्पष्ट केले. केंद्र सरकारने ५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू- काश्मीरमधून कलम ३७० हटवले होते. ऑक्टोबर २०२० पासून घटनापीठ या प्रकरणाची सुनावणी करत आहे. या याचिकांवर सरन्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. ज्यामध्ये न्या. संजय किशन कौल, न्या. संजीव खन्ना, न्या. भूषण गवई आणि न्या. सूर्यकांतही असतील.