परमबीर सिंह यांच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी

परमबीर सिंह यांच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या वतीने अनिल देशमुख यांच्याविरोधातील याचिकेवर आज मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्याशिवाय यासंबंधित इतर याचिकांवरही सुनावणी होण्याची शक्यता आहे. परमबीर सिंग यांनी मुंबई हायकोर्टात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मुंबई हायकोर्टात आज मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.

मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती जी.एस. कुलकर्णी यांच्या खंडपीठात ही सुनावणी होणार आहे. परमबीर सिंग यांच्यावतीने विक्रम ननकानी बाजू मांडत आहेत. तर, आशुतोष कुंभकोणी यांनी राज्य सरकारच्या वतीनं बाजूनं मांडली आहे.

हे ही वाचा:

नितीन गडकरींकडून महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा

धर्म बदलून निकाह कर…नाहीतर तुझीही निकिता तोमर करू.

भितीदायक, महाराष्ट्राने ओलांडला ५०,००० रुग्णवाढीचा टप्पा

गेल्या सुनावणीदरम्यान परमबीर सिंग यांच्या याचिकेवरील आदेश राखून ठेवण्यात आला आहे. राज्य सरकारला या आरोपांमधील तथ्य शोधून काढायचं आहे. आरोपांविषयीचं तथ्य बाहेर आणायचं आहे त्यामुळे ही जनहित याचिका फेटाळावी, असा युक्तिवाद कुंभकोणी यांनी केला होता. यानंतर न्यायालयानं तथ्य मांडण्यास सांगितलं. त्यामुळे आज याप्रकरणी काय निर्णय होतो, याकडे सर्वांचचं लक्ष लागलं आहे.

अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला १०० कोटींची खंडणी दार महिन्याला गोळा करायला सांगितली होती, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंह यांनी केला आहे.

Exit mobile version