ठाकरे सरकारला दणका देत मुंबई हायकोर्टाने अकरावी प्रवेशसाठी २१ ऑगस्ट २०२१ रोजी होणारी सीईटी परीक्षा रद्द केली आहे. राज्य सरकारनं सीईटी संदर्भात २८ मे रोजी एक अध्यादेश काढला होता. तो अध्यादेश न्यायालयाने रद्द केल्यानंतर भाजपा नेत्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. भाजपा नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय. मुंबई उच्च न्यायालयाने फटकारल्यानं ठाकरे सरकारच्या “छडी लागे छम् छम् विद्या येई घम् घम्”अशा प्रकारची ही चंपी झालेय, अशी टीका आशिष शेलार यांनी केलीय.
अकरावीची सीईटी रद्द करताना मा. उच्च न्यायालयाने राज्य सरकारचा हा निर्णय अनियंत्रित, अवास्तव, कठोर, भेदभाव करणारा, लहरी आणि घटनेच्या समानतेच्या हक्काचे उल्लंघन करणारा आहे, अशा कठोर शब्दांत ठाकरे सरकारला फटकारलेय.
"छडी लागे छम् छम् विद्या येई घम् घम्"अशा प्रकारची ही चंपी झालेय.
1/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 11, 2021
अकरावीची सीईटी रद्द करताना मा. उच्च न्यायालयाने राज्य सरकारचा हा निर्णय अनियंत्रित, अवास्तव, कठोर, भेदभाव करणारा, लहरी आणि घटनेच्या समानतेच्या हक्काचे उल्लंघन करणारा आहे, अशा कठोर शब्दांत ठाकरे सरकारला फटकारलेय. “छडी लागे छम् छम् विद्या येई घम् घम्”अशा प्रकारची ही चंपी झाली आहे, अशी टीका शेलारांनी राज्य सरकार आणि शालेय शिक्षण मंत्रालयालावर केली आहे.
ठाकरे सरकारच्या लहरीपणामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान झाले. वारंवार आम्ही अनेक बाबी लक्षात आणून दिल्या. न्यायालयाने फटकारले. तरीही लहरी सरकार काहीही शिकलेच नाही.. शिक्षणाचा हा अभूतपूर्व घोळ घालणाऱ्या आघाडी सरकारला आता विचारावेसे वाटते तुमची “इयत्ता कंची?”, असा सवाल आशिष शेलार यांनी राज्य सरकारला केला आहे.
हे ही वाचा:
आरं बाबा ज्याची तुला भीती नाही, ते वारंवार कशाला बोलतो?
नीरज चोप्राचा ‘असा’ होणार सन्मान
पत्नीला गावावरून बोलवण्यासाठी त्याने मुलांनाच लावले पणाला!!
खरतर राज्य सरकारने अकरावी प्रवेशाबाबत २८ मे २०२१ रोजी एक अध्यादेश जारी केला होता. मात्र, सरकारच्या अध्यादेशाला स्थगिती देण्याची मागणी अनन्या पत्की या आयसीएससीच्या विद्यार्थिनीने करत मुंबई उच्च न्यायालयात तिचे वडील ऍडव्होकेट योगेश पत्की यांच्यावतीनं याचिका दाखल केली होती.