दसरा मेळाव्यासाठी छत्रपती शिवाजी पार्क मैदान कुणाला मिळणार? याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला असून, शिवसेनेला न्यायालयाने मेळाव्यासाठी परवानगी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर मेळावा घेता यावासाठी म्हणून न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याची आज, २३ सप्टेंबरला सुनावणी पार पडली आहे.
शिवसेनेकडून वकील एसपी चिनॉय आणि मुंबई महापालिकेकडून वकील मिलिंद साठे यांनी युक्तिवाद केला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वकिलानेही जोरदार युक्तिवाद केला आहे. तिन्ही बाजूनेच युक्तिवाद तब्ब्ल चार तास चालला होता. यावेळी न्यायालयाने सांगितलं की, खरी शिवसेना कोणती यामध्ये आम्हला पडायचंच नाही. शिवसेनेला यापूर्वी दसरा मेळाव्याची परवानगी मिळाली होती. एकनाथ शिंदे यांच्यावतीने आणि उद्धव ठाकरे यांच्यावतीने दाखल करण्यात आलेले अर्ज नाकारण्याचा पालिकेचा निर्णय योग्यच होता, असाही निर्णय न्यायालयाने म्हटलं आहे.
दसरा मेळावा हा शिवसेनेचा इतिहास आहे. मूळ शिवसेना कुणाची हा मुद्दा इथे नाही. दरवर्षी शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा होतो. त्यामुळे आम्हालाच परवानगी मिळायला हवी. उद्या कोणीही वैयक्तिक येऊन परवानगी मागेल तर ते योग्य नाही, असे शिवसेनेचे वकील एसपी चिनॉय यांनी युक्तिवाद केला आहे. न्यायालयाने अटी आणि शर्तींसह शिवसेनेला परवानगी दिली आहे. २ ते ६ या वेळेतच पालिकेने मेळाव्यासाठी परवानगी दिली आहे.
अर्ज नाकारण्याचा पालिकेचा अधिकार योग्य असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. मात्र, पालिकेचा निर्णय वास्तविकतेला धरुन नसल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा अनेक वर्ष सुरु आहे. सरकारकडून शिवाजी पार्कवर ४५ दिवस कार्यक्रमासाठी राखून ठेवले आहेत.
हे ही वाचा:
गणेश रामदासी ‘मराठवाडा भूषण’चे मानकरी
एनआयएच्या कारवाईनंतर पीएफआयकडून केरळमध्ये तोडफोड
बारावीनंतर विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना करता येणार नोकरी
अमेरिका का म्हणतोय UNSC मध्ये भारताला कायमस्वरुपी सदस्यत्व द्या?
दरम्यान, सदा सरवणकर यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या वकिलाच्या युक्तिवादाशी उच्च न्यालयाने सहमत असल्याचे म्हटले आहे. खरी शिवसेना कोणाची यावर आम्ही भाष्य करत नाही. तो निर्णय अजून प्रलंबित आहे. त्यामुळे खरी शिवसेना कोणाच हा मुद्दा आजचा नाही.