राज्यसभेसाठी शुक्रवार, १० जून रोजी म्हणजेच आज मतदान आहे. महाविकास आघाडीचे आमदार नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे तुरुंगात आहेत. त्यांना मतदान करता यावे म्हणून न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यांची मागणी गुरुवारी सत्र न्यायालायने फेटाळली होती. त्यानंतर मलिकांनी उच्च न्ययालयात अर्ज केला होता. मात्र उच्च न्यायालयानेही मलिकांची मागणी फेटाळली आहे.
अनिल देशमुखांनी उच्च न्यायालयात अर्ज केला नव्हता. फक्त नवाब मलिक यांनीच उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळली आहे. त्यांनतर मलिक यांनी नवीन याचिका दाखल केली. परंतु, न्यायालयाने नवीन याचिका घेण्यास नकार दिला आहे.
हे ही वाचा:
राज्यसभा निवडणूक मतदानापूर्वी महाविकास आघाडीत बिघाडी?
‘आंदोलन करून कार्यकर्ते पंकजा मुंडेंचं नुकसान करणार’
१८ जुलैला होणार राष्ट्रपती पदासाठी निवडणूक
मलिक,देशमुखांची मतदानासाठी केलेली याचिका फेटाळली
दरम्यान, अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदान करता यावे म्हणून न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. राज्यसभा निवडणुकीत फक्त विधानसभेचे सदस्यच मतदान करू शकतात. त्यामुळे आम्हाला मतदान करू दिले पाहिजे असा युक्तिवाद न्यायालयात करण्यात आला होता. पण न्यायालायने आरोपी मतदान करू शकत नाही असे, म्हणत त्यांची मागणी फेटाळून लावली होती. नवाब मलिक यांच्यावर ईडीचे आरोप आहेत. तर अनिल देशमुख यांच्यावर ईडी आणि सीबीआयचे आरोप आहेत. मविआचे हे दोन्ही नेते मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगात आहेत.