बिटकॉइन्समध्ये व्यवहार केला आहे का? भाजपाचा सुप्रिया सुळे, नाना पटोलेंना सवाल

भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी ऐकवल्या ऑडिओ क्लिप

बिटकॉइन्समध्ये व्यवहार केला आहे का? भाजपाचा सुप्रिया सुळे, नाना पटोलेंना सवाल

राज्यातील निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. पुण्याचे माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्यावर बिटकॉइनच्या रूपात गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे. भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदानाच्या आदल्या रात्री घेतलेल्या पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे यांच्यासह नाना पटोलेंचं नाव घेत काही ऑडिओ क्लिपचा संदर्भ दिला आहे. सुप्रिया सुळे या ऑडिओ क्लिपमध्ये बिटकॉईनचे व्यवहार करून निवडणुकांसाठी निधी जमा करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

विदेशी चलनाचा वापर करून सुप्रिया सुळे आणि नाना पटोले हे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप करत त्याची चौकशी करण्याची मागणी सुधांशु त्रिवेदी यांनी केली आहे. सुधांशू त्रिवेदी यांनी दोन ऑडिओ क्लिप ऐकवल्या आणि काही चॅटिंग दाखवत पैसे दिले जात असल्याचा आरोप केला. त्रिवेदी म्हणाले की, या क्लिपमधील आवाज तुमचा आहे की नाही, असा सवालही सुधांशू त्रिवेदी यांनी सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांना केला. ओडिओ क्लिपमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांचा आवाज ऐकू येत असून त्या म्हणत आहेत की, “बिटकॉईन ऐवजी रोख पाहिजे. तुम्हाला कोणत्याही तपासाची काळजी करण्याची गरज नाही, तपास आलाच तर आमचे सरकार ते हाताळेल.”

भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी म्हणाले की, “एमव्हीएचा खरा चेहरा उघड करणारी गंभीर आणि चिंताजनक तथ्ये समोर आली आहेत. हे खुलासे लोकशाही प्रक्रिया, निवडणुकांच्या निष्पक्षता आणि पारदर्शकतेवर शंका उपस्थित करतात. माजी सरकारी अधिकाऱ्याने केलेले आरोप लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत चिंतेचा विषय आहेत. समोर आलेले तथ्य आणि आरोपांची सखोल चौकशी केली जाईल. मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी या खुलाशांकडे त्वरित लक्ष देणे आवश्यक आहे.”

हे ही वाचा:

विधानसभा २०२४: नेत्यांसह, खेळाडू आणि कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क

तावडे यांनी कुठलेही पैसे वाटलेले नाहीत!

बुडत्याला ५ कोटीच्या पुडीचा आधार…

सोमेश टोचतो, सज्जादमुळे गुदगल्या होतात हेच तर परिवर्तन आहे…

दरम्यान, सुधांशू त्रिवेदींचे आरोप निराधार आहेत. निवडणुकीच्या आदल्या रात्री खोटी माहिती पसरवली जात आहे. जनतेची फसवणूक करण्यासाठी खोटे आरोप केल्याबद्दल त्यांना कायदेशीर नोटीस देणार आहे, असे सुप्रिया सुळे यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Exit mobile version