पवारांच्या शागिर्दाने १५ हजार कोटी रुपये लुटले

पवारांच्या शागिर्दाने १५ हजार कोटी रुपये लुटले

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. “कोरोना काळात सामान्य जनता लॉकडाऊनच्या झळा सोसत असताना, ठाकरे सरकारकडून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार सुरु होता. ठाकरे सरकारचे मंत्री हसन मुश्रीफ जनतेला लुटत होते. मंत्रालय पूर्णपणे असताना शरद पवारांचे शागिर्द १५ हजार कोटी रुपये लुटत होते. असा आरोप सोमय्या यांनी मुश्रीफ यांच्यावर केला आहे.

हसन मुशिफ यांचा हा घोटाळा सिद्ध झाला असल्यामुळे मुश्रीफ यांनी आता मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही सोमय्यांनी केली. त्याचबरोबर हसन मुश्रीफ यांच्या जावयाला दिलेलं १ हजार ५०० कोटीचं कंत्राट अखेर रद्द करण्यात आल्याचंही सोमय्या यांनी सांगितलं. २७ हजार ग्रामपंचायतींचा टीडीएस रिटर्न भरण्यासाठी पुढील १० वर्षासाठी हे कंत्राट दिलं गेलं होतं. ८ महिन्यांपूर्वी मुश्रीफांचे जावई मतीन यांनी ही जयोस्तुते कंपनी विकत घेतली. जयोस्तुते कंपनीची मागच्या ८ वर्षात एक रुपायाचंही खरेदी विक्री नाही. याचा सगळा पाठपुरावा केल्यानंतर आता ठाकरे सरकारनं हे कंत्राट रद्द केलं आहे. याबाबत तक्रार करायला जातानाच मला अडवण्यात आलं होतं. ठाकरे सरकार हे भ्रष्टाचारी सरकार आहे, हेच यातून पुन्हा एकदा सिद्ध होत आहे. असं सोमय्या म्हणाले.

हे ही वाचा:

सोशल मीडियामध्ये येणार नवे ‘ट्रम्प’कार्ड

आंदोलकांना रस्ते अडवण्याचा अधिकार नाही

शाहरुख खान आर्यनच्या भेटीला!

हा भारताच्या संघ भावनेचा विजय

यापूर्वीही सोमय्या यांनी मुश्रीफ यांच्यावर आरोप करत घोटाळे उघड केले होते. ब्रिक्स इंडिया ही हसन मुश्रीफ परिवाराची बेनामी कंपनी आहे. हजार कोटी नाहीतर एक लाख कोटीचा दावा दाखल करा. पण मी सांगतो की हसन मुश्रीफ आणि परिवार यांनी घोटाळ्याचा पैसा बेनामी कंपन्या, शेल कंपनीकडून या दोन कारखान्यात गुंतवणूक केली. त्याबाबत तपास सुरु आहे. या तपासाला गती मिळावी यासाठी ईडीला कागदपत्र दिल्याचं सोमय्यांनी सांगितलं.

Exit mobile version