गडहिंग्लज साखर कारखान्यात हसन मुश्रीफ यांनी १०० ​कोटींचा घोटाळा केला

गडहिंग्लज साखर कारखान्यात हसन मुश्रीफ यांनी १०० ​कोटींचा घोटाळा केला

गडहिंग्लजच्या आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्याशी मुश्रीफ यांचा काय संबंध आहे? असा सवाल करत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या कारखान्यात हसन मुश्रीफ यांनी १०० ​कोटींचा घोटाळा केला आहे, असा गंभीर आरोप केला आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधातील ईडी कारवाईच्या भीतीनं माझ्यावर कारवाई करण्यात आली. मुश्रीफ यांच्या विरोधातील सर्व पुरावे ईडीला देणार आहे, असंही सोमय्या यांनी केला आहे.

“मी उदाहरण देतो. २०२० मध्ये कोणत्याही प्रकारे ट्रान्सपरंट बिडींग न होता, हा कारखाना ब्रिक्स इंडिया प्रा लि या कंपनीला दिला. या कंपनीला साखर कारखाना चालवायाचा अनुभव नाही. पण या कंपनीला का कारखाना दिला हे शरद पवारांना माहिती आहे. कारण मतीन हसीन मंगोली हे हसन मुश्रीफ यांचे जावई ते या ब्रिक इंडिया बेनामीचे मालक आहेत. या कंपनीत ७१८५ शेअर एस यू कॉर्पोरेषन प्रायव्हेट, ९९८ मतीन हसीनचे, तर ९९८ गुलाम हुसेनचे आहेत. म्हणजे परत सरसेनापती कारखान्यासारखे ९८ टक्के शेअर एस यू कार्पोरेशन या बेनामी कंपनीकडे. म्हणजे हसन मुश्रीफ यांनी २०१९-२० मध्ये ग्रामविकास मंत्री झाल्यानंतर जो भ्रष्ट मार्गाने पैसा कमावला, तो इथे पास केला आहे.”

“आमची मागणी आहे, की या घोटाळ्याचीही चौकशी व्हायला हवी. पुन्हा एकदा आपण भेटणार इथे किंवा कोल्हापूरला. हसन मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळा उघड करणार.”

हे ही वाचा:

आज होणार हसन मुश्रिफांचा आणखीन एक घोटाळा उघड

जॅवलिन एक प्रेमकथा…नीरज चोप्राच्या जाहिरातीचा धमाका

पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांच्यावर महिला आयएएस अधिकाऱ्याने काय केला होता आरोप?

किरीट सोमैय्या यांना कराडमध्ये केले स्थानबद्ध

हसन मुश्रीफांमुळे मला अंबाबाईचं दर्शन करता आलं नाही. ठाकरे सरकार हे घोटाळे उघडकीस आणणाऱ्याला अटक करणारं सरकार आहे, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. पोलिसांनी मला कोणत्या आदेशाअंतर्गत मला गणेश विसर्जनापासून रोखलं. मला काल सहा तास कोंडून ठेवण्यात आलं. मी हात जोडून विनंती केली की ऑर्डर दाखवा. पुराव्यासह मी कागल पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करणार होतो पण मला अडवलं गेलं, असंही ते म्हणाले. सीएसएमटी स्टेशनवर मला पोलिसांनी धक्काबुक्की देखील केली. मुंबईबाहेर जाण्यापासून रोखण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश मला पोलिसांनी दाखवले, असंही सोमय्या म्हणाले. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी जबाबदारी स्विकारावी, असं ते म्हणाले. सत्तेसाठी तुम्ही हिरवा रंग धारण केला असेल. उद्धव ठाकरे सरकारचा उद्धटपणा आम्ही चालून देणार नाही, असंही ते म्हणाले. पोलिसांच्या विरोधात आम्ही हायकोर्टात जाणार असल्याचंही ते म्हणाले. माझ्यावर हल्ला व्हावा ही सरकारची इच्छा आहे का? असा सवालही ते म्हणाले.

Exit mobile version