जयंत पाटील एका गोष्टीमुळे आमच्यासोबत आले नाहीत, अन्यथा त्यांनी आमच्या सोबतच शपथ घेतली असती. ती गोष्ट नेमकी काय आहे ते मी वेळ आल्यावर स्पष्ट करेन, असा दावा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकार कटिबद्ध असून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आम्ही सुद्धा समाजाचा पाठीशी उभे असल्याचे मंत्री मुश्रीफ म्हणाले. कोल्हापूर येथे प्रसार माध्यमांशी मंत्री मुश्रीफ बोलत होते.
मंत्री हसन मुश्रीफ आज सकाळी कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगाव येथे जात असताना सकल मराठा समाजाकडून त्यांची गाडी अडवण्यात आली. मुश्रीफांच्या गाडी थांबवत समाजाच्या मागण्या एकूण घेतल्या. मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी त्यांची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. कोल्हापूर येथे प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, सकल मराठा समजाकडून माझी गाडी अडवण्यात आली मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी त्याची मागणी होती. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आम्ही सुद्धा समाजाच्या पाठीशी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जयंत पाटील यांनी केलेल्या आरोपावर मंत्री मुश्रीफ यांनी जयंत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले.
ते म्हणाले की, जयंत पाटील एका गोष्टीमुळे आमच्यासोबत आले नाहीत, अन्यथा त्यांनी आमच्या सोबतच शपथ घेतली असती. ती गोष्ट नेमकी काय आहे ते मी वेळ आल्यावर स्पष्ट करेन. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवारांचे निष्ठांवत म्हणून ओळख राहिलेल्या मुश्रीफ ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकल्यानंतर अजित पवार गटात सामील झाले आहेत. पीएम मोदी यांनी नगरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शरद पवारांवर जोरदार टीका केली होती. मात्र, या टिकेला हसन मुश्रीफ यांनी मौन बाळगले. त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, जयंत पाटील यांच्याबाबत मुश्रीफांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकार कटिबद्ध
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटील यांनी उपोषणाला पुन्हा सुरुवात केली.यावर मंत्री मुश्रीफ म्हणाले, मनोज जरांगे यांनी उपोषण केल्यापासून सकल मराठा समाजाकडून ठीक ठिकाणी आंदोलने होत आहेत.अनेक गावागावात प्रवेश बंदी करण्यात आली आहे.सकल मराठा समाजाकडून आज माझी गाडी अडवण्यात आली आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी त्याची मागणी होती.
सकल मराठा समाजाकडून ज्या-ज्या वेळी आंदोलने झाली तेव्हा-तेव्हा आमचा सहभाग होता.कोल्हापुरातील दसरा चौकात ज्यावेळी मराठा समाजाचे उपोषण झाले त्यावेळी आम्ही आम्ही सुद्धा उपस्थित होतो. मराठा समाजातील गरीब लोकांना शिक्षणासाठी आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळावे ही आमची भावना असल्याचे मंत्री म्हणाले.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न झाला परंतु सर्वोच्च न्यायालयात ते टिकले नाही.त्यानंतर देशामध्ये जाट, गुजर समाजाकडून आंदोलने करायला सुरुवात केल्यानंतर केंद्र सरकारने EWS खाली आरक्षण देण्याचा प्रयत्न केला होता.
हे ही वाचा..
भेसळखोरांवर अन्न व औषध प्रशासनाचे लक्ष
वडाळ्यात सापडला महिलेचा तुकडे केलेला मृतदेह
मृत्युदंडाच्या शिक्षेपासून आठ भारतीय वाचू शकतील का?
ललित पाटील प्रकरणात ठाकरे गटाच्या नेत्याचे नाव
परंतु, यामधूनसुद्धा मराठा समाजावरील अन्याय दूर होत नाही अशी भावना मराठा समाजाची झाली आणि त्यानंतर जरांगे यांच्याकडून आंदोलनाला सुरुवात झाली .सरकारला दिलेल्या ४० दिवसांच्या अल्टिमेट नंतर जरांगे आंदोलनाला बसले आहेत.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहेत.त्यामुळे यावर शासन लवकरात लवकर निर्णय काढून मराठा समाजाला आरक्षण देईल असे मला वाटते, असे मंत्री म्हणाले.तसेच मराठा समाजाने शांततेने आणि अहिंसक मार्गाने आंदोलन करावे अशी आमची भावना असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.