ठाकरे सरकारच्या अकलेचं दिवाळं निघालाय का?

ठाकरे सरकारच्या अकलेचं दिवाळं निघालाय का?

ठाकरे सरकार सत्तेत आल्यापासून हिंदूंच्या सणांना विरोध करत असल्याची टीका भाजपा आमदार राम कदम यांनी केली आहे. ठाकरे सरकारने होळी पेटवण्यावर आणलेल्या बंदीच्या तुघलकी फर्मानाला विरोध करताना राम कदम यांनी ठाकरे सरकारच्या अकलेचं दिवाळं निघालाय का? असा टोला लगावला.

“हिंदू विरोधी ठाकरे सरकार म्हणतेय होळी घराच्या दारा समोर पेटवायची नाही. तर मग काय घरात पेटवायची? लोक रंगपंचमी समजू शकतात गर्दी होईल. एकमेकांना स्पर्श होईल मात्र नियमांचे पालन करत होळी पेटवली आणि हिंदू बांधवांनी आपला सण साजरा केला तर त्याला ठाकरे सरकारचा विरोध का?” असे ट्विट राम कदम यांनी केले आहे.

हे ही वाचा:

पुन्हा एकदा महाराष्ट्रात वाढले ३५००० पेक्षा जास्त कोरोना रुग्ण

महाराष्ट्रात जमावबंदीची नियमावली जारी

पराभवाच्या भीतीने ममता बॅनर्जी त्रस्त, भाजपा कार्यकर्त्याला फोन करून मदतीची विनवणी

बांग्लादेशच्या स्वातंत्र्याची पहिली मागणी जनसंघाचीच

“ज्या दिवसापासून महाराष्ट्रात ठाकरे सरकार सत्तेत आलंय, त्या दिवसापासून सातत्यानं हिंदूंच्या सणांना हे तीन पक्षांचं वसुली सरकार सातत्यानं विरोध करतंय. त्याच ठिकाणी दुसऱ्या धर्माच्या लोकांनी त्यांच्या सणांसाठी परवानगी मागितली की ताबडतोब दिली जाते. पण आपल्या हिंदूंच्या सणांना मात्र हे ठाकरे सरकार विरोध करतं. आता ते म्हणतायत,होळी घराच्या दारासमोरसुद्धा पेटवायची नाही. पेटवली तर तुमच्यावर गुन्हा दाखल होईल. होळी दारासमोर नाही पेटवायची तर काय घरात पेटवायची? ठाकरे सरकारच्या अकलेचं काय दिवाळं निघालंय? लोक एकवेळ रंगपंचमी समजू शकतात. त्यामुळे लोकं गर्दीच्या ठिकाणी एकत्र येतील आणि ती गर्दी टाळली पाहिजे हेही लोक समजू शकतात. पण तुमचा होळी पेटवण्याला विरोध का? नियमांचं पालन करत हिंदू बांधव जर आपला सण साजरा करणार असतील, तर त्यालाही तुमचा विरोध? या महाराष्ट्राच्या तीन पक्षांना उत्तर द्यावं लागेल, की सत्तेत आल्यापासून त्यांचा हिंदू धर्म आणि हिंदू बांधवांना एवढा विरोध का?” असे व्हिडिओच्या माध्यमातून राम कदम म्हणाले.

Exit mobile version