“केवळ मीडियात येऊन अश्रू पुसणं आणि प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन त्यांची अश्रू पुसणं वेगळं आहे. तौक्ते वादळातही आम्ही साईटवर होतो. आताही होतो. त्यामुळे रिकामटेकडे दौरा करतात की फक्त टीका करतात हे महाराष्ट्राची जनता पाहात आहे. एवढ्या पूरग्रस्त परिस्थितीत राऊत कधी पाण्यात उतरले का?” अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर केली आहे.
प्रविण दरेकर यांनी मीडियाशी संवाद साधताना संजय राऊत यांना चोख उत्तर दिलं. संजय राऊत यांनी बोलताना उक्ती आणि कृती याचं तारतम्य बाळगावं. एवढ्या पूरग्रस्त परिस्थितीत राऊत कधी पाण्यात उतरले का?, कुठे पाहणी करायला गेले का?, केवळ मीडियात येऊन वेगवेगळी वक्तव्य करणं अश्रू पुसणं हे वेगळं आहे. तोक्ते निसर्ग वादळात आम्ही साईटवर गेलो होतो. आता रिकामटेकडे दौरा करतात की टीका करतात हे महाराष्ट्राची जनता पाहते आहे, अशी टीका दरेकर यांनी केली. देवेंद्र फडणवीस ग्रासरूटचे नेते आहेत. सर्वसामान्य जनतेचा कानोसा राऊतांनी घ्यावा, असा सल्लाही त्यांनी दिला.
पुन्हा येईन… पुन्हा येईन… हा विषय आता जूना झाला आहे. ते शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. देवेंद्र फडणवीस लोकनेते आहेत. राणे हे शिवसैनिक होते, ते त्यांनी कधी नकारलं नाही. राऊतांनी राणेंचं उदाहरण देत कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा देण्याचं काम केलंय. त्यांच्या बोलण्याला अर्थ नाहीये, असा टोलाही त्यांनी लगावला.
हे ही वाचा:
जैश ए मोहम्मदच्या ‘या’ दहशतवाद्याला कंठस्नान
‘राष्ट्र प्रथम, नेहमी प्रथम’ ही भावना महत्वाची
केरळ, महाराष्ट्रात तिसरी लाट आली?
कमलप्रीतची कमाल जीत, अंतिम फेरी निश्चित!
राज्याचे मुख्यमंत्री पंतप्रधानांवर काही बोलत नाहीत. त्यामुळे राऊतांच्या बोलण्याला महत्व नाही. पंतप्रधानांनी राज्याला ७०० कोटी रुपये दिले आहेत. राज्याला आणखी निधी मिळावा म्हणून भाजपा पंतप्रधांनाकडे मागणी करेल, असं त्यांनी सांगितलं. पूरग्रस्त भागात भीषण परिस्थिती आहे. व्यापारी आणि शेतकऱ्यांचं जीवनच उद्ध्वस्त झालं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस सरकारने जीआर काढून जशी मदत केली होती. तशीच मदत लोकांना जाहीर करणं अपेक्षित आहे, असंही ते म्हणाले.