हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू असतानाचं आता तेथील कॉंग्रेस नेत्यांना पक्षाकडून जोरदार दणका मिळाला आहे. पक्षविरोधी कारवाया करत असल्याचा आरोप कॉंग्रेसच्या काही नेत्यांवर करण्यात आला असून त्यांना पक्षाने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. हरियाणा काँग्रेसने आपल्या १३ नेत्यांची हकालपट्टी केली आहे.
हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकीची गडबड सुरू असतानाचं आता निवडणुकीदरम्यान काँग्रेस पक्षाने आपल्याच नेत्यांवर कारवाई केली आहे. पक्षविरोधी कारवायांमध्ये गुंतलेल्या आढळल्याने हरियाणा काँग्रेसने शुक्रवार, २७ सप्टेंबर रोजी आपल्या १३ नेत्यांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे. हरियाणा प्रदेश काँग्रेस कमिटीने तसे अधिकृत पत्र काढले आहे. हे नेते आपल्याच पक्ष-नियुक्त उमेदवारांविरुद्ध निवडणूक लढवत होते, असा आरोप करण्यात आला आहे.
काँग्रेसच्या अधिकृत निवेदनात असे म्हटले आहे की, पक्षाच्या उमेदवारांविरुद्ध चालू विधानसभा निवडणूक लढवून पक्षविरोधी कारवायांमध्ये गुंतलेले पक्ष नेते आणि कार्यकर्त्यांशी संबंधित विविध संपर्क माध्यमांद्वारे अहवाल प्राप्त झाल्यामुळे आणि पक्षातील अनुशासनाला आळा घालण्यासाठी या व्यक्तींची पक्षातून सहा वर्षांसाठी तत्काळ प्रभावाने हकालपट्टी करण्यात आली आहे.
Haryana Congress expelled 13 leaders from the party for 6 years after they were found indulging in anti-party activities by fighting the ongoing assembly election against the party candidates: Haryana Pradesh Congress Committee pic.twitter.com/NgTVJYXVdD
— ANI (@ANI) September 27, 2024
हकालपट्टी करण्यात आलेले नेते
नरेश धांडे, परदीप गिल, सज्जन सिंग धुल, सुनीता बट्टण, राजीव मामुराम गोंदर, दयाल सिंग सिरोही, विजय जैन, दिलबाग संदिल, अजित फोगट, अभिजीत सिंग, सतबीर राटेरा, नितू मान, अनिता धुल्ल बडसिकरी
हे ही वाचा :
बांगलादेशी पॉर्नस्टार उल्हासनगरात, पोलिसांकडून अटक
आसाम आयईडी प्रकरण: एनआयएकडून उल्फा (आय) च्या कार्यकर्त्याला अटक
इस्रायलच्या हल्ल्यात हिजबुल्लाहच्या हवाई दलाचा कमांडर ठार
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला?, समितीचा अहवाल आला समोर!
काँग्रेसने यापूर्वी चित्रा सरवरा, राजेश जून आणि शारदा राठोड यांच्यासह तीन नेत्यांची हकालपट्टी केली होती. चित्रा या अंबाला कँटमधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत, राजेश जून हे बहादूरगडमधून अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहेत, तर शारदा राठोड यांनी बल्लभगडमधून उमेदवारी दाखल केली आहे. हरियाणा काँग्रेसमधील तिकीट वाटप प्रक्रियेदरम्यान अनेक नेत्यांनी पक्षांतर्गत बंडखोरी केल्याचे चित्र होते.