हरियाणा काँग्रेसकडून आणखी १० नेत्यांची हकालपट्टी

अखिल भारतीय काँग्रेस समितीने दिली माहिती

हरियाणा काँग्रेसकडून आणखी १० नेत्यांची हकालपट्टी

हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू असतानाचं काँग्रेस पक्षातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर येताना दिसत आहे. कॉंग्रेस नेत्यांना त्यांच्या पक्षाकडूनचं जोरदार दणका मिळत आहे. काही नेत्यांवर पक्षविरोधी कारवाया करत असल्याचा आरोप करण्यात आला असून त्यांना पक्षाने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. हरियाणा काँग्रेसने आपल्या १० नेत्यांची हकालपट्टी केली आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हरियाणा काँग्रेसने पक्षांतर्गत मोठी कारवाई केली आहे. हरियाणा काँग्रेसने पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत १० नेत्यांची पक्षातून ६ वर्षासाठी हकालपट्टी केली आहे. याबाबतची माहिती अखिल भारतीय काँग्रेस समितीने (AICC) दिली आहे.

हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकीची गडबड सुरू असतानाचं आता निवडणुकीदरम्यान काँग्रेस पक्षाने आपल्याच नेत्यांवर कारवाई केली आहे. यापूर्वीही पक्षविरोधी कारवायांमध्ये गुंतलेल्या आढळल्याने हरियाणा काँग्रेसने शुक्रवार, २७ सप्टेंबर रोजी आपल्या १३ नेत्यांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे. हरियाणा प्रदेश काँग्रेस कमिटीने तसे अधिकृत पत्र काढले आहे. हे नेते आपल्याच पक्ष-नियुक्त उमेदवारांविरुद्ध निवडणूक लढवत होते, असा आरोप करण्यात आला आहे.

हे ही वाचा : 

सुनीता विल्यम्स यांचा पृथ्वीवर येण्याचा मार्ग मोकळा; नासाची टीम अंतराळात पोहोचली

इस्रायलने बेरूतमध्ये केलेल्या हल्ल्यात चार जण ठार

अखेर ६ दिवसानंतर अक्षयचा मृतदेह स्मशानात दफन, पोलिसांच्या बंदोबस्तात अंत्यसंस्कार!

मोदींना सत्तेतून हटवणार नाही, तोपर्यंत जिवंत राहीन!

काँग्रेसने यापूर्वी चित्रा सरवरा, राजेश जून आणि शारदा राठोड यांच्यासह तीन नेत्यांची हकालपट्टी केली होती. चित्रा या अंबाला कँटमधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत, राजेश जून हे बहादूरगडमधून अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहेत, तर शारदा राठोड यांनी बल्लभगडमधून उमेदवारी दाखल केली आहे. हरियाणा काँग्रेसमधील तिकीट वाटप प्रक्रियेदरम्यान अनेक नेत्यांनी पक्षांतर्गत बंडखोरी केल्याचे चित्र होते.

Exit mobile version