हरियाणाच्या नव्या सरकारचा शपथविधी १७ ऑक्टोबरला होणार आहे. माहितीनुसार, नायब सिंग सैनी सकाळी १० वाजता राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. पंचकुलामध्ये हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. या शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाचे अनेक ज्येष्ठ नेते सहभागी होणार आहेत.
शपथविधी सोहळ्याला सुमारे ५० हजार लोक उपस्थित राहण्याची शक्यता असून भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्रीही या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. याशिवाय केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या शीर्ष नेतृत्वासह पक्षाचे वरिष्ठ नेतेही या कार्यक्रमाला उपस्थित असतील असे बोलले जात आहे. अनिल विज, कृष्ण लाल मिधा, श्रुती चौधरी, अरविंद कुमार शर्मा, विपुल गोयल, निखिल मदान यांना हरियाणा सरकारच्या नवीन मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते, अशी शक्यता आहे.
भाजपाने मार्च २०२४ मध्ये हरियाणा पक्षाच्या अध्यक्षपदावरून नायब सिंग सैनी यांना मुख्यमंत्री केले. त्यावेळी मनोहर लाल यांच्या साडेनऊ वर्षांच्या कार्यकाळानंतर भाजपला सत्ताविरोधी लाटेचा सामना करावा लागला होता. नायब सिंग सैनी यांनी बुधवारी दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि पक्षाच्या इतर वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. यानंतर गुरुवारी त्यांनी राजधानीत केंद्रीय मंत्री आणि हरियाणा भाजपचे निवडणूक प्रभारी धर्मेंद्र प्रधान यांचीही भेट घेतली.
हे ही वाचा:
भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराजकडे डीएसपी पदाची जबाबदारी
भारत सामर्थ्यशाली होऊ नये म्हणून प्रयत्न सुरू
हिज्ब-उत-तहरिर आता दहशतवादी संघटना!
शांततेचा नोबेल पुरस्कार अण्वस्त्रमुक्त जगासाठी काम करणाऱ्या जपानच्या संस्थेला
८ ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगाने हरियाणाच्या सर्व ९० विधानसभा जागांचे निकाल जाहीर केले आहेत. निवडणुकीच्या निकालात भाजपला तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्यासाठी पूर्ण बहुमत मिळाले आहे. त्याचबरोबर काँग्रेसला तिसऱ्यांदा विरोधात बसावे लागणार आहे. भाजपने ४८ जागा जिंकल्या आहेत. तर, काँग्रेसला ३७ जागा मिळाल्या.