हार्दिक पटेल करणार भाजपामध्ये प्रवेश

हार्दिक पटेल करणार भाजपामध्ये प्रवेश

गुजरात मधील काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल यांनी काँग्रेसला काही दिवसांपूर्वी रामराम ठोकला होता. त्यांनतर त्यांनी मंगळवार,३१ मे रोजी रोजी ते भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे. हार्दिक पटेल २ जूनला भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत.

हार्दिक पटेल यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींकडे त्यांचा राजीनामा पाठवला होता. त्यांनतर त्यांनी काँग्रेस पक्षावर गंभीर टीका केली होती. काँग्रेस हा सर्वात मोठा जातीयवाद पक्ष असल्याचे पटेल म्हणाले होते. ते म्हणाले होते की, काँग्रेसने माझ्यावर कोणतीही जबाबदारी सोपवली नाही. कार्याध्यक्षांच्या जबाबदाऱ्या केवळ कागदावर होत्या. मला दोन वर्षे कोणतीही जबाबदारी देण्यात आली नाही. गुजरात आणि गुजरातींबद्दल द्वेष असल्यासारखे पक्षात वागणूक दिली जात होती, असा गंभीर आरोप हार्दिक पटेल यांनी काँग्रेसवर केला होता.

हार्दिक पटेल यांच्या राजीनाम्यांनंतर ते भाजपामध्ये प्रवेश करतील अश्या चर्चा रंगल्या होत्या. याबाबत त्यांनी आता एएनआयला माहिती दिली आहे. येत्या २ जूनला त्यांचा भाजपामध्ये प्रवेश होणार आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वीच पटेल यांनी गुजरातमध्ये काँग्रेसला धक्का दिला आहे.

हे ही वाचा:

जामा मशिदीच्या घुमटाचा कळस कोसळला आणि…

काश्मिरी पंडित शिक्षिकेची गोळ्या झाडून हत्या

काँग्रेसच्या आशिष देशमुख यांनी चिडून दिला राजीनामा

‘ आम्हाला रोखण्यासाठी आजोबा आणि नातवाचा प्रशासनावर दबाव’

२०१५ च्या पाटीदार आरक्षणासाठी हार्दिक पटेल यांनी नेतृत्व केल्यांनतर ते चर्चेत आले होते. त्यांनतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. २०२० पासून ते गुजरात काँग्रेसचे कार्यध्यक्ष होते.

Exit mobile version