गुजरातच्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस नेते आणि गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. हार्दिक पटेल यांनी त्यांच्या ट्विटर बायोमधून काँग्रेस पक्षाचे नाव काढून टाकलं होतं. त्यानंतर राजकीय वर्तुळात अखेर चर्चांना उधाण आलं होतं. अखेर निवडणुकीआधी त्यांनी पक्षश्रेष्ठींना पत्र लिहित राजीनामा दिला आहे.
हार्दिक पटेल यांच्या राजीनाम्यामुळे गुजरात काँग्रेसमधील अंतर्गत वाद समोर आला आहे. गुजरात काँग्रेसचे कार्याध्यक्ष हार्दिक पटेल यांनी बुधवार, १८ मे रोजी राजीनामा दिला. हार्दिक पटेल यांनी ट्विट केले असून त्यात ते म्हणाले की, “आज मी धैर्यानं काँग्रेस पक्षाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मला खात्री आहे की, माझ्या निर्णयाचे माझे सर्व सहकारी आणि गुजरातचे लोक स्वागत करतील. मला विश्वास आहे की, माझ्या या निर्णयानंतर मी भविष्यात गुजरातसाठी खरोखर सकारात्मक काम करू शकेन.”
आज मैं हिम्मत करके कांग्रेस पार्टी के पद और पार्टी की प्राथमिक सदस्यता से इस्तीफा देता हूँ। मुझे विश्वास है कि मेरे इस निर्णय का स्वागत मेरा हर साथी और गुजरात की जनता करेगी। मैं मानता हूं कि मेरे इस कदम के बाद मैं भविष्य में गुजरात के लिए सच में सकारात्मक रूप से कार्य कर पाऊँगा। pic.twitter.com/MG32gjrMiY
— Hardik Patel (@HardikPatel_) May 18, 2022
हे ही वाचा:
संघ मुख्यालयाची रेकी करणाऱ्या दहशतवाद्याला अटक
आरेमधल्या झाडांसाठी लढणाऱ्या शिवसेनेची वाशीमधल्या झाडांसाठी चुप्पी
…म्हणून भारताच्या नकाशात दिसतो श्रीलंका!
जम्मू-काश्मीरमध्ये दारूच्या दुकानावरील ग्रेनेड हल्ल्यात एक ठार
पाटीदार आरक्षण आंदोलनाचा चेहरा म्हणून ते देशासमोर आले होते. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासूनच गुजरात काँग्रेसमधील महत्त्वाच्या चेहऱ्यांपैकी एक म्हणून हार्दिक पटेल यांची ओळख निर्माण झाली होती. पण गेल्या काही दिवसांपासून हार्दिक पटेल यांनी पक्षश्रेष्ठींबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. तसेच, काँग्रेस नेतृत्त्वावरुन काही प्रश्नही उपस्थित केले होते. त्यामुळे ते काँग्रेस सोडणार का यावर राजकीय वर्तुळातून चर्चा सुरू होत्या.