बुधवार, १८ मे रोजी काँग्रेसचे गुजरातचे कार्याध्यक्ष हार्दिक पटेल यांनी काँग्रेसच्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर त्यानी आज पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेस हा सर्वात मोठा ‘जातीयवाद पक्ष’ असल्याचा आरोप पटेल यांनी केला आहे.
विधानसभेची निवडणूक होण्याआधीच पटेल यांनी काँग्रेसला धक्का दिला आहे. त्यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींकडे त्यांचा राजीनामा पाठवला आहे. राजीनाम्यांनंतर त्यांनी काँग्रेसला चांगलेच धारेवर धरले आहे. ते म्हणाले, काँग्रेस हा सर्वात मोठा जातीयवादी पक्ष आहे. काँग्रेसने माझ्यावर कोणतीही जबाबदारी सोपवली नाही. कार्याध्यक्षांच्या जबाबदाऱ्या केवळ कागदावर आहेत. मला दोन वर्षे कोणतीही जबाबदारी देण्यात आली नाही. गुजरात आणि गुजरातींबद्दल द्वेष असल्यासारखे पक्षात वागणूक दिली जात होती, असा गंभीर आरोप हार्दिक पटेल यांनी काँग्रेसवर केला आहे. तसेच यावेळी पटेल यांनी पाटीदार नेत्यांची माफी देखील मागितली आहे. ते म्हणाले, मी जेष्ठ पाटीदार नेत्यांची माफी मागतो. कारण त्यांनी मला काँग्रेसमध्ये न जाण्याचा सल्ला दिला होता, तरीही मी काँग्रेस मध्ये गेलो, त्यामुळे त्यांनी माफी मागितली आहे.
हे ही वाचा:
काँग्रेसचे जोखड सोडल्यावर जाखड भाजपावासी
‘सत्तेचा टांगा पलटी, आणि सत्ताधारी फरार’
राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या, ईडीकडून गुन्हा दाखल
पंजाब पोलिसांनी केला हेरगिरी नेटवर्कचा पर्दाफाश, दोघांना अटक
दरम्यान, २०१५ च्या पाटीदार आरक्षणासाठी त्यांनी नेतृत्व केल्यांनतर ते चर्चेत आले होते. त्यांनतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. २०२० पासून ते गुजरात काँग्रेसचे कार्यध्यक्ष होते. आता पुढे त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यांनतर पुढे ते कोणत्या पक्षात जातात याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.